शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

‘हमीदवाडा’,‘बिद्री’ची महिन्याभरात रणधुमाळी

By admin | Updated: April 27, 2017 00:51 IST

राजकीय हालचाली गतिमान : वाढीव सभासदांबाबत साखर सहसंचालक कार्यालयाकडून छाननी पूर्ण

कोल्हापूर : सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना, हमीदवाडा व दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री या दोन कारखान्यांची रणधुमाळी येत्या महिन्याभरात सुरू होणार आहे. ‘हमीदवाडा’ कारखान्यासाठी संस्थांकडून ठराव पाठविण्याची मुदत ५ मेपर्यंत आहे, तर ‘बिद्री’च्या वाढीव सभासदांची छाननी महसूल विभागाकडून सुरू आहे. दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकीचे वातावरण कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यांत तापू लागले असून, राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. ‘बिद्री’च्या वाढीव सभासदांबाबत साखर सहसंचालक कार्यालयाकडून छाननी होऊन महसुली तपासणीसाठी राधानगरी, करवीर, भुदरगड, कागल तालुक्यांतील संबंधित तलाठ्यांकडे दिलेली आहे. येत्या पंधरा दिवसांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. ‘हमीदवाडा’ची प्रक्रिया साखर सहसंचालक कार्यालयाने सुरू केली असून संलग्न संस्थांचे प्रतिनिधी ठराव मागविले आहेत. आतापर्यंत १८१ पैकी ६६ संस्थांनी आपल्या प्रतिनिधींच्या नावे ठराव दाखल केले आहेत. उर्वरित संस्थांसाठी ५ मेपर्यंत मुदत असून त्यानंतर संस्था गटांची यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकती घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मतदार यादी प्रसिद्ध केल्यापासून २५ दिवसांत अंतिम यादी आणि त्यानंतर दहा दिवसांचा निवडणूक कार्यक्रम राबविला जातो. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या पश्चात पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. कागलमधील सर्वच गटांनी निवडणूक ‘बिनविरोध’ करण्याचे आश्वासन दिले असले तरी कागल हे ‘राजकीय विद्यापीठ’ आहे. त्यामुळे ऐनवेळी काहीही होऊ शकते.मंडलिक यांच्या गाठीभेटी ‘हमीदवाडा’ कारखान्याचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी कार्यक्षेत्रातील गावात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी २० ते २५ गावांत दौरा करून निवडणुकीची तयारी केली आहे.दृष्टिक्षेपात ‘हमीदवाडा’उत्पादक सभासद - २५६१०संस्था सभासद - १८१संचालक मंडळ संख्या - २१गट - मुरगूड, कसबा सांगाव, कागल, बिद्री-बोरवडे, चिखली, सेनापती कापशी.