शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हाळवणकर, यड्रावकर ‘सेफ’

By admin | Updated: September 30, 2014 01:04 IST

छाननीत अर्ज वैध : ‘दक्षिण’मधून राष्ट्रवादीच्या दुर्वास कदम यांचा अर्ज अवैध

 कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी झालेल्या छाननीत जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या इचलकरंजी मतदारसंघात आमदार सुरेश हाळवणकर यांचा अर्ज वैध ठरला, तर शिरोळ मतदारसंघात डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर हेच राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचा निर्णय देण्यात आला. ‘कोल्हापूर दक्षिण’मधील राष्ट्रवादीचे उमेदवार दुर्वास कदम यांचा अर्ज अवैध ठरल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादीचे घड्याळ दिसणार नाही. जिल्ह्यातील १० मतदारसंघांत ३० अर्ज अवैध ठरले, तर २८० अर्ज वैध ठरले. आज, सोमवारी सकाळी ११ वाजता तहसील व प्रांत कार्यालयांत अर्ज छाननीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. सुरेश हाळवणकर यांच्या वीज चोरी प्रकरणातील शिक्षा व दोषित्वाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांची उमेदवारी वैध ठरविण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी दिला. तब्बल तीन तास या हरकतीसंदर्भात सुनावणी झाली. ‘शिरोळ’मध्ये राष्ट्रवादीने राजेंद्र पाटील-यड्रावकर व जि.प.चे सदस्य धैर्यशील माने या दोघांना ए. बी. फार्म दिला होता. दोन्ही उमेदवारांच्या कायदेतज्ज्ञांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर बाजू मांडली. यात प्रथम अर्ज दाखल केलेल्या यड्रावकर यांनी बाजी मारली. बुधवारी (दि. १) दुपारी मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे.