शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागातील सुमारे २७ हजार बेरोजगारांना निम्मा पगार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 12:19 IST

कोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर विभागातील बेरोजगार झालेल्या सुमारे २७,४२२ जणांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्मी रक्कम मदत म्हणून मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी कामगार राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) सदस्य असणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर विभागातील सुमारे २७ हजार बेरोजगारांना निम्मा पगार !अटल विमा कल्याण योजनेतून मदत : ईएसआयसीचे सदस्य असणे आवश्यक

कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर विभागातील बेरोजगार झालेल्या सुमारे २७,४२२ जणांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्मी रक्कम मदत म्हणून मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी कामगार राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) सदस्य असणे आवश्यक आहे.कोरोनाच्या साथीच्या संकटामुळे नोकरी गेल्याने बेरोजगार झालेल्यांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्म्या रकमेची मदत अटल विमा कल्याण योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याअंतर्गत कोल्हापूर विभागातील कितीजणांना मदत होईल, याबाबतचा आढावा लोकमतने  घेतला.

कोरोनापूर्वी फेब्रुवारीमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण ३,२८,८४१ कामगारांची भविष्यनिर्वाह निधीची वर्गणी भरण्यात आली होती.

ऑगस्टमध्ये ही संख्या ३,०१,४१९ पर्यंत आली आहे. त्यामुळे या विभागातून २७,४२२ जण बेरोजगार झाले असण्याची शक्यता आहे. त्यांतील जे कामगार हे ईएसआयसीचे सदस्य असतील, त्यांना अटल विमा कल्याण योजनेतून मदत मिळणार आहे.अशी मिळावा पात्र-अपात्रतेची माहितीबेरोजगार झालेल्या कामगारांना या अटल विमा कल्याण योजनेतील मदत मिळविण्यासाठी ते पात्र आहेत की, अपात्र हे ईएसआयसी आयपी पोर्टलच्या माध्यमातून जाणून घेता येईल. या पोर्टलवर कामगारांनी त्यांचा १० अंकी विमा क्रमांक नोंदविल्यानंतर त्यांना ही माहिती मिळेल. दर महिन्यात त्यांच्याकडून आणि कंपनीकडून किती रक्कम वर्गणीपोटी ईएसआयसीकडे जमा झाली हेही जाणून घेता येईल.

या योजनेतून मदत मिळविण्यासाठी संबंधित कामगार हे ईएसआयसीचे सदस्य असणे आवश्यक आहे. योजनेची माहिती ईएसआयसी आयपी पोर्टलवर उपलब्ध आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार योजनेबाबतची पुढील कार्यवाही जिल्हा पातळीवर करण्यात येईल.- सूरज रेवणकर, शाखा प्रबंधक, ईएसआयसी, कोल्हापूर

असंघटित क्षेत्रात काम करणारे, ईएसआयसी लागू नसणारे, कंत्राटी पद्धतीने काम करणारे अनेकजण कोरोनामुळे बेरोजगार झाले आहेत. स्वयंरोजगार करणाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय केंद्र सरकारने लवकर घ्यावा, या मागणीसाठी लवकरच कामगार संघटना संयुक्त कृती समितीद्वारे निदर्शने केली जाणार आहेत.- अतुल दिघे, निमंत्रक, कामगार संघटना संयुक्त कृती समिती

आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • ईएसआयसीकडे नोंदणी असणारे कोल्हापुरातील कामगार : १०७३८१
  • भविष्यनिर्वाह निधीत सध्या समावेश असलेले कोल्हापूर विभागातील कामगार : ३०१४१९
  •  या निधीतून कमी झालेले कामगार : २७४२२

 

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारjobनोकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर