शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
2
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
3
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
4
अजित पवारांकडून जाहीरपणे समाचार, पण चंद्रकांत पाटलांनी संयम दाखवला; नेमकं काय घडलं?
5
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
6
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
7
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
8
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
9
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
गुरु आदित्य योग: ७ राशींना भाग्यकारक, येणी वसूल होतील; व्यवसायात नफा, नोकरीत पद-पगार वाढ!
11
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
12
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
13
९ वर्षांपासून फरार, FBI ने गुजराती तरुणावर ठेवले २०८००००० रुपयांचे बक्षीस, कोणता गुन्हा केलाय?
14
ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर', प्रोमोला मिळतेय पसंती
15
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
16
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
17
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
18
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
19
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
20
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला

हळदीची विक्रमी आवक

By admin | Published: March 26, 2017 12:13 AM

शेतकऱ्यांत समाधान : सरासरी साडेआठ हजार क्विंटलला भाव

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठ दिवसांपासून हळदीच्या आवकेत वाढ होत आहे. आठ दिवसांत तब्बल एक लाख ९४ हजार ६२४ पोत्यांची आवक झाली. त्यामध्ये परपेठेतून आलेल्या ८० हजार पोत्यांचा समावेश आहे. हळदीला सरासरी साडेआठ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. चांगल्या प्रतीच्या हळदीला साडेनऊ हजारपर्यंत भाव मिळत आहे. चांगला भाव मिळत असल्याने जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी माल घेऊन यावे, असे आवाहन सभापती प्रशांत शेजाळ यांनी केले आहे. यंदा हळदीची लागवड चांगली झाली होती. त्यामुळे उत्पादन वाढले. बाजारपेठेत गेल्या आठ दिवसांत हळदीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सांगलीची बाजारपेठ हळदीसाठी प्रसिद्ध आहे. येथे गतवर्षी सहा लाख पोत्यांची आवक झाली होती. यंदा विक्रमी आवक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील आठ दिवसांत तब्बल एक लाख ९४ हजार ६२४ पोत्यांची आवक झाली. परपेठेतूनही मोठ्या प्रमाणात माल येत असून, सुमारे ८० हजार पोती विक्रीसाठी दाखल झाली आहेत. १८ मार्च रोजी राजापुरी आणि परपेठेतील ३१ हजार ३४० पोती विक्रीसाठी आली. २० मार्चला ३२ हजार, ३१ रोजी १७ हजार ६६८, २२ रोजी ३१ हजार पोती, २३ रोजी २८ हजार २०४, २४ मार्च रोजी २० हजार ८६८ पोत्यांची आवक झाली. राजापुरी हळदीला प्रति क्विंटल सरासरी साडेआठ हजार रुपये, तर परपेठेतील हळदीला सरासरी सात ते साडेसात हजार रुपये भाव मिळत आहे. बाजारपेठेत मालाची आवक वाढली असली तरी, दरामध्ये दर स्थिर असल्याने शेतकरी समाधानी आहेत. (प्रतिनिधी)पोषक वातावरण : उत्पादनात मोठी वाढमहाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणासह केरळ राज्यातून हळदीची आवक होते. मागील दोन वर्षात हळदीला सरासरी नऊ हजारापासून तेरा हजारापर्यंत भाव मिळाला. चालू वर्षात हळदीच्या पिकासाठी पोषक वातावरण असल्याने उत्पादनात भरमसाठ वाढ होणार आहे. एकरी नऊ ते दहा क्विंटल बियाणे लागत असून, लागवडीसाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येतो. शेतकऱ्यांना एकरी अठरा ते पंचवीस क्विंटल हळदीचे उत्पादन मिळते. येत्या दोन महिन्यात हळदीचा हंगाम सुरू होणार असून, गतवर्षीपेक्षा दुप्पट उत्पादन होणार असल्याचे अटळ आहे. बाजारात हळदीची आवक वाढली असली तरी, दर टिकून आहेत. पुढील आठवड्यातही हळदीची आवक वाढणार असल्याचे सभापती शेजाळ यांनी सांगितले.