शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अन्ननलिकेत अडकली केसांत घालायची पिन, यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सात वर्षाच्या बालिकेला मिळाले जीवदान

By संदीप आडनाईक | Updated: October 6, 2022 16:22 IST

दोन दिवस ती अन्ननलिकेत अडकून पडल्यामुळे अन्ननलिकेला छिद्र पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.

कोल्हापूर : बालिकेचे वय वर्षे अवघे सात. दोन दिवसांपूर्वी गिळताना त्रास होत असल्याने तिने आक्रोश मांडला होता. तिचे हाल पाहून आई-वडिलांनी तिला मंगळवारी (दि.४) मध्यरात्री सीपीआरमध्ये आणले. तिच्या छातीचा तसेच मानेची क्ष-किरण तपासणी केली असता तिच्या अन्ननलिकेत केसांत घालायची पिन अडकल्याचे दिसून आले. संभाव्य धोके लक्षात घेउन डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. भूल देऊन दुर्बिणीद्वारे त्याच पहाटे शस्त्रक्रिया करुन अन्ननलिकेत अडकलेली ही केसांची पिन काढली आणि या बालिकेला जीवदान दिले. शस्त्रक्रियेनंतर काल, बुधवारी तिला डिस्चार्ज देण्यात आला. तिची प्रकृती उत्तम असल्याचा निर्वाळा डॉक्टर लोकरे यांनी दिला.पन्हाळा तालुक्यातील गरीब कुटूंबातील या बालिकेचे आई-वडील तिला मंगळवारी रात्री दोन वाजता सीपीआर मध्ये घेऊन आले. तिने दोन दिवसांपूर्वी केसांची ही पिन गिळली होती. तिच्या लक्षणांवरुन डॉक्टरांनी तिच्या छातीची तसेच मानेची एक्स-रे (क्ष-किरण) तपासणी केली, तेव्हा ती पिन अन्ननलिकेत अडकल्याचे आढळले. रुग्णांच्या नातेवाईकांनी या शस्त्रक्रियेची माहिती, तसेच संभाव्य धोके यांची कल्पना देउन पहाटे २.४५ वाजता राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर (छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय) येथे हिरण्यकेशी इमारतीत कान, नाक, घसाशास्त्र विभागात दाखल केले.मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भूल देउन दुर्बिणीद्वारे ही पिन काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. यासाठी कान, नाक, घसाशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अजित लोकरे, सहयोगी प्राध्यापक तदर्थ डॉ. वासंती पाटील आणि त्यांच्या टीमने परिश्रम घेतले. त्यांना अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरिष कांबळे, भूलतज्ज्ञ डॉ. प्रदीप रावत यांनी सहकार्य केले.दीड सेंटीमीटर होती पिनया बालिकेच्या अन्ननलिकेत अडकलेल्या या केसांच्या पिनेची लांबी साधारण १.५ सेंटीमीटर होती. दोन दिवस ती अन्ननलिकेत अडकून पडल्यामुळे अन्ननलिकेला छिद्र पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. परंतु वेळीच अचून निदान झाल्यामुळे हे संभाव्य धोके टाळण्यात डॉक्टरांच्या टीमला यश आले. ही अत्यंत गुंतागुंतीची आणि जोखमीची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी कुशलपणे पार पाडली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल