शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

एच-१बी व्हिसा निलंबनाने कोल्हापूर, सांगलीतील २५० जणांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 11:20 IST

एच-१ बी व्हिसा निलंबित झाल्याने नोकरी अथवा शिक्षणासाठी अमेरिकेत असलेल्या, त्या ठिकाणी जाणाऱ्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे २५० जणांसमोर अडचण निर्माण झाली आहे. हा व्हिसा घेऊन त्या ठिकाणी ऑनसाईट काम करणाऱ्या आयटी कंपन्यांनाही फटका बसणार आहे.

ठळक मुद्देअमेरिकेतील शिक्षण, नोकरीला मुकावे लागणार ऑनसाईट काम करणाऱ्या आयटी कंपन्यांना बसणार फटका

संतोष मिठारीकोल्हापूर : एच-१ बी व्हिसा निलंबित झाल्याने नोकरी अथवा शिक्षणासाठी अमेरिकेत असलेल्या, त्या ठिकाणी जाणाऱ्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे २५० जणांसमोर अडचण निर्माण झाली आहे. हा व्हिसा घेऊन त्या ठिकाणी ऑनसाईट काम करणाऱ्या आयटी कंपन्यांनाही फटका बसणार आहे.एच-१ बी आणि विदेशी कामगारांना दिले जाणारे इतर सर्व कामकाजी व्हिसा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निलंबित केले आहेत. त्याचा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार आणि आयटी कंपन्यांवर काय परिणाम होणार याचा आढावालोकमतने घेतला.

अमेरिकेत विविध क्षेत्रांतील उच्च शिक्षण घेण्यासाठी जाण्याकरिता आणि त्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी विद्यार्थी, नोकरदार हे एच-१ बी  व्हिसा घेतात. त्यांतील काहीजण शिक्षण घेण्याआधी, तर काहीजण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा व्हिसा मिळवितात. विविध आयटी कंपन्या अमेरिकेत ऑनसाईट काम करणाऱ्यासाठी हा व्हिसा घेऊन भारतातील मनुष्यबळ त्या ठिकाणी पाठवितात. कारण, अमेरिकेतील स्थानिक मनुष्यबळापेक्षा भारतातून कमी वेतनात मनुष्यबळ मिळते आणि हे त्या कंपन्यांना फायदेशीर ठरत होते.

त्यामुळे बहुतांश कंपन्या या व्हिसाचा उपयोग करून घेत होत्या. मात्र, आता हा व्हिसा निलंबित झाल्याने कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील अशा साधारणत: चार कंपन्यांची अडचण वाढणार आहे; तर शिक्षण, नोकरीनिमित्त अमेरिकेत असलेल्या २५० जणांना मायदेशी परतावे लागणार आहे. उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी अमेरिकेला जाण्याच्या तयारीत अथवा प्रतीक्षेत असलेल्यांना मात्र, त्यासाठी आता मुकावे लागणार आहे.

एच-१ बी  व्हिसा घेऊन शिक्षण, नोकरीसाठी अमेरिकेत दरवर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून सुमारे २५० जण जातात. व्हिसा निलंबनामुळे त्यांची अडचण झाली आहे. १० वर्षांहून अधिक काळ त्या ठिकाणी भारतातील अनेकजण काम करीत आहेत. त्यांचा व्हिसा कायम ‌‌ठेवण्याचा निर्णय होण्याबाबत केंद्र सरकारने पाठपुरावा करावा.-बी. व्ही. वराडे, पर्यटनतज्ज्ञ

या व्हिसा निलंबनाच्या निर्णयाचा लोकल मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या आयटी कंपन्यांवर परिणाम होणार नाही; पण अमेरिकेत ऑनसाईट कामासाठी आपल्या देशातून कर्मचारी पाठविणाऱ्या कंपन्यांची अडचण होणार आहे.- विनय गुप्ते, आयटी उद्योजक

व्यवसायासाठी व्हिसा घेण्याचा पर्यायनोकरीच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेमध्ये असलेल्यांना भारतात परत येणे शक्य होणार नाही. त्यामुळे आता तेथे व्यवसाय करण्याचा व्हिसा घेऊन राहण्याच्या पर्याय त्यांना निवडता येणार आहे.एच-१ बी व्हिसा म्हणजे काय?एच-१ बी व्हिसा हा अमेरिकेमध्ये दाखल होण्यासाठीचा एक प्रकारचा व्हिसा आहे. हा व्हिसा इमिग्रेशन ॲण्ड नॅशनालिटी ॲक्टच्या कलम १०१ (ए)(१५)-(एच)नुसार दिला जातो. अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक व्हिसांपैकी हा एक आहे. हा व्हिसा परदेशी लोकांनी अमेरिकेत ठरावीक मुदतीसाठी ये-जा करण्यासाठी तसेच पगारी काम करण्यासाठी देण्यात येतो. हा व्हिसा घेऊन अमेरिकेत दाखल झाल्यावर ठरावीक कंपनीकरता ठरावीक मुदतीसाठी ठरावीक काम करण्याची मुभा मिळते. (संदर्भ : विकिपीडिया)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpassportपासपोर्टkolhapurकोल्हापूर