शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

ग्रामीण भागातही गुटखा निर्मितीचे केंद्र

By admin | Updated: September 18, 2015 23:41 IST

शिरोळ तालुका : मुळाशी जाऊन तपास करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

संदीप बावचे -- जयसिंगपूर  इचलकरंजी येथील गुटखा कारवाईची घटना ताजी असतानाच शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे येथे गुटखा निर्मिती कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी बेकायदेशीर गुटखाप्रकरणी कारवाई केल्याने पुन्हा एकदा नियंत्रण ठेवणाऱ्या संबंधित विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संबंधितांवर जरब बसविली, तरच अवैध गुटखा निर्मिती केंद्रांवर चाप बसणार आहे.  इचलकरंजी हे पश्चिम महाराष्ट्रातील गुटखा निर्मिती व विक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. शहरालगतच कर्नाटक राज्याची हद्द असल्याने तेथून सहजासहजी गुटखा उपलब्ध होत असल्याचे मिळालेल्या माहितीतून पुढे आले आहे. या तस्करीतूनच इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागाला याची लागण लागली आहे. आॅगस्ट २०१५ मध्ये अवैध गुटखा निर्मितीचे केंद्र पोलिसांनी उद्ध्वस्त केल्याची घटना ताजी असतानाच इचलकरंजी शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोंडिग्रे येथे मंगळवारी (दि. १५) जयसिंगपूर पोलिसांनी गुटखा निर्मिती कारखान्यावर छापा टाकून गुटखा मिक्सिंग करणाऱ्या दोन मशिनरींसह विमल, डीडी, सागर अशा गुटख्यांचे पाऊचदेखील जप्त केले. यातील मुख्य सूत्रधार विलास जमदाडे (हरीपूर) व कुमार कचरे (कोंडिग्रे) हे दोघे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाय परप्रांतीय कामगार मिळून आल्याने संशयितांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. गुटखा तयार करण्यासाठी कर्नाटकातून कच्चा माल आणून तो याठिकाणी पक्का करण्यात येत होता. विशेष म्हणजे या गुटख्याच्या पाऊचवर ठिकाण, तारीख अथवा इतर कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. तरीही बाजारामध्ये खुलेआम तो विकला जात होता. याचा तपास करण्याचे आवाहन जयसिंगपूर पोलिसांसमोर आहे. अवैध गुटखा निर्मितीचे कारखाने आता ग्रामीण भागातही पोहोचू लागल्यामुळे यावर जरब बसविणार तरी कोण? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. राज्य शासनाने गुटख्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असला, तरी तो आता नावापुरताच शिल्लक राहत आहे. कारवाईनंतर संशयित जामिनावर पुन्हा मोकाट सुटतात व नव्याने गुटखा निर्मितीचा उद्योग सुरू होतो. हे इचलकरंजीतील कारवाईने स्पष्ट झाले आहे. येथील कारवाईनंतर गुटखा हद्दपार होईल, अशी अशा असतानाच कोंडिग्रे येथील कारवाईतून पुन्हा ही यंत्रणा कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.कायद्यातील पळवाटा संशयितांच्या पथ्यावरकायद्यातील पळवाटेमुळे संशयित आरोपी मोकाट सुटतात. कारवाईनंतर त्यांना ठोस शिक्षा होत नाही. यामुळे उत्पादकांना काहीच भय उरलेले नाही. त्यामुळे पुन्हा गुटखा उत्पादन जोमात सुरू असल्याचे वास्तव आहे.कर्नाटकातून कच्च्या मालाची आवककर्नाटकातून कच्चा माल आणण्यात आल्याचे कोंडिग्रे येथील कारवाईतून स्पष्ट झाले आहे. यामुळे हा कच्चा माल पुरविणाऱ्या यंत्रणेचे उच्चाटन करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. शासनाने बंदी घातल्यामुळे गुटख्याच्या किमतीत भरमसाठ वाढ करून उत्पादकांनी चांगलीच कमाई केली. यामुळे आजही परिसरात गुटखा राजरोसपणे मिळत असल्याचे चित्र आहे.