आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २६ : खून, खुनाचा प्रयत्न असे पंचवीसपेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुंडास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी राज्यातून हद्दपार केले. संशयित अजित दत्तात्रय मोहिते (वय ३३, रा. विक्रमनगर) असे त्याचे नाव आहे. त्याला राजारामपुरी पोलिसांनी रविवारी निपाणी (जि. बेळगाव) येथे सोडले. यापूर्वी तो हद्दपार असताना कोल्हापुरात मिळून आला होता. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात हजर केले असता त्याला सहा महिन्यांची शिक्षा झाली होती. हाणामारी, जुगार, मटका, आदी अवैध व्यवसायात तो अग्रभागी असल्याने त्याला राज्याबाहेर हद्दपार करण्याचा निर्णय नांगरे-पाटील यांनी घेतला. या कारवाईचा धसका इतर गुन्हेगारांनी घेतला आहे.
गुंड अजित मोहिते राज्यातून हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2017 19:22 IST