शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे काम दिशादर्शक : अरुण काकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 16:53 IST

ग्रामीण भागामध्ये आपला व्यवसाय सांभाळून सर्वसामान्यांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. संस्थेच्या प्रगतीचे आकडे पाहिल्यानंतर या संस्थेचे काम दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांनी काढले.

ठळक मुद्देस्वामी विवेकानंद पतसंस्थेचे काम दिशादर्शक  :अरुण काकडे कोल्हापूर कसबा गेट शाखेचे उद्घाटन

कोल्हापूर : ग्रामीण भागामध्ये आपला व्यवसाय सांभाळून सर्वसामान्यांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. संस्थेच्या प्रगतीचे आकडे पाहिल्यानंतर या संस्थेचे काम दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांनी काढले.आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवव्या आणि कोल्हापुरातील दुसऱ्या कसबा गेट शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. लईस शहा होते. एकूणच पतसंस्थांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेताना काकडे म्हणाले, गरजेतून पतसंस्थांची निर्मिती झाली आणि त्या विश्वासाच्या पाठबळावर टिकल्या. मध्यंतरी या संस्थांच्या भवितव्याबाबत जोरदार चर्चा झाली. मात्र २०१५ नंतर महाराष्ट्र शासनाने केलेल्या सर्वच पतसंस्थांच्या कडक तपासणीनंतर आता टिकणाऱ्या संस्थाच तेवढ्या शिल्लक राहिल्या आहेत. २००७ पासून स्वामी विवेकानंद पतसंस्थेची वाटचाल मी पाहत आहे. नेमक्या पद्धतीने सभासदांच्या हिताचा विचार करून संस्थेचे कामकाज सुरू आहे. कोकण विभागामध्ये तर स्वामी विवेकानंद पतसंस्था ही दिशादर्शक ठरली आहे.अध्यक्ष अ‍ॅड. लुईस शहा म्हणाले, माझा आणि या संस्थेचा ऋणानुबंध अनेक वर्षांचा आहे. बदलत्या परिस्थितीतही पतसंस्था टिकणे गरजेचे आहे. मध्यंतरी या चळवळीबाबत गैरसमज निर्माण झाले. मात्र त्यावेळी फारच एकांगी मांडणी करण्यात आली. पतसंस्थेचे विश्वस्त म्हणून काम करण्याची गरज आहे.संस्थेचे चेअरमन जनार्दन टोपले यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, २०० सभासद आणि ५० हजार रुपयांच्या ठेवींवर सुरू झालेल्या या संस्थेचा वार्षिक व्यवसाय आज १५० कोटींच्या घरात आहे. संस्थेच्या मुख्य कार्यालयासह भादवण, पेरणोली, मुंबई, सावंतवाडी, कोल्हापूर येथे स्वमालकीच्या शाखा इमारती आहेत. कोल्हापुरातील आझाद चौक शाखा ही सर्वसामान्य महिलांसाठी आधारवड ठरली असून, याच भूमिकेतून कसबा गेट शाखाही काम करील.यावेळी जागामालक सुभाष पाटील, इंजिनिअर नितीन सोहनी यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले; तर संस्थेचे माजी अध्यक्ष मलिककुमार बुरुड यांनी आभार मानले.कार्यक्रमाला संस्थेचे व्हाइस चेअरमन दयानंद भुसारी, संस्थेचे माजी अध्यक्ष बापू टोपले, हरी नार्वेकर, तुकाराम कोटकर, सुभाष नलवडे, ज्येष्ठ संचालक नारायण सावंत, रवींद्र दामले, रामचंद्र्र पाटील, महेश नार्वेकर, सुधीर कुंभार, संजय घंटे, सुरेश कुंभार, राजेंद्र चंदनवाले, प्रेमा सुतार, माधवी कारेकर, आझाद चौक शाखा चेअरमन सुनील निकम, जनरल मॅनेजर अर्जुन कुंभार, शाखा व्यवस्थापक नारायण बेहरे यांच्यासह सल्लागार उपस्थित होते. 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर