शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वारणा समूहाचे मार्गदर्शक डॉ. भाऊसाहेब राजाराम गुळवणी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 20:25 IST

वारणा परिसराचे ऋषीतुल्य, मार्गदर्शक स. आ. तथा मामासाहेब गुळवणी, वारणा समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्यासोबत सहकारातील विकासाचे धडे गिरवले.

कोल्हापूरः वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाच्या जडणघडणीत मोठे योगदान ठरलेले आणि वारणा परिसरातील अध्यात्मिक ऋषीतुल्य, वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचे उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब राजाराम गुळवणी (८७) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण वारणा परिसरावर शोककळा पसरली. वारणा परिसराचे ऋषीतुल्य, मार्गदर्शक स. आ. तथा मामासाहेब गुळवणी, वारणा समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्यासोबत सहकारातील विकासाचे धडे गिरवले. त्यामुळे वारणेच्या एकूण प्रवासात डॉ. गुळवणी मामा यांचा सिंहाचा वाटा होता.ऋषितुल्य मामासाहेब यांचा आध्यात्मिक विचारांचा वारसा देखील त्यांनी चालविला. वारणेतील प्रत्येक शुभकार्याचा प्रारंभ मामासाहेब यांच्या हस्ते केला जात होता. त्यामुळे वारणा समूहाचे ते आधारवड होते. वारणा दूध संघाला त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथे त्यांचा ५ मार्च १९३३ ला जन्म झाला. ते नेबापूर (ता.पन्हाळा) वास्तव्यास होते. वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधर असलेले मामासाहेब यांनी पन्हाळा, कळे येथे शिक्षण संस्थांची स्थापना केली.अभ्यासू व्यक्तीमत्व, स्मितहास्य, सर्वसमावेशक दूरदृष्टी असलेले भाऊसाहेब लोकांचे जीवनदायी होते. वारणा दूध संघामध्ये १९९० पासून संचालक म्हणून कार्यास सुरुवात केली. २००५ ते २०१६ मध्ये अध्यक्ष, १९९६ ते २००५ ,व २०१५ पासून उपाध्यक्ष , आज अखेर उपाध्यक्ष होते. पन्हाळा शिक्षण संस्थेसह वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळाचे अध्यक्ष तसेच महात्मा गांधी मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त, वारणा अँग्रोचे संचालक, तळसंदे येथील नवजीवन उद्योग संस्था समूहातील संस्थांचे संस्थापक होते. वारणा दूध संघाबरोबरच वारणा परिसरातील संस्थांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.