शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

पालकमंत्र्यांनी घेतला सीपीआरमधील डॉक्टरांचा तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST

कोल्हापूर : माझ्या वाॅर्डातील एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू होणार नाही, अशा भावनेतून मनापासून काम करा. काही अडचणी असतील, तर ...

कोल्हापूर : माझ्या वाॅर्डातील एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू होणार नाही, अशा भावनेतून मनापासून काम करा. काही अडचणी असतील, तर सांगा. परंतु कोणत्याही परिस्थितीत इतक्या वाईट परिस्थितीत दुर्लक्ष परवडणार नाही, अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तासच घेतला.

पाटील यांनी सकाळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैदयकीय महाविद्यालयाच्या सर्व विभागप्रमुख आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर सरवदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, गेल्यावर्षी आपण सर्वांनी चांगल्या पध्दतीने काम केले आहे. परंतु यंदा काही तरी उणिवा रहात आहेत. एकमेकावर जबाबदारी ढकलून चालणार नाही. कोण सिनिअर, ज्युनिअर असे चालणार नाही. जीवन-मरणाचा विचार करा, दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. आपण कुठे कमी पडतोय, याचे चिंतन करा. कोविडपूर्वी इतर रुग्णसंख्या मोठ्या संख्येने असतानाही चांगले उपचार होत होते. आता कुठे कमी पडत आहोत, याचा शोध घ्या. समाजाचा सीपीआरवरील विश्वास दृढ करा.

पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘अधिक दक्षता घेऊन चोवीस तास सेवा देऊन मृत्यूदर कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू, असा विश्वास उपस्थित विभागप्रमुखांच्यावतीने डॉ. सरवदे, डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. विजय बर्गे, डॉ. राहुल बडे यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, एकही रुग्ण दगावणार नाही, असे ध्येय प्रत्येकाने ठेवा. माझ्या ड्युटीत एकही मृत्यू होणार नाही, एवढी दक्षता मी बाळगेन, अशी शपथ घ्या.

चौकट

तक्रारींची पालकमंत्र्यांनी घेतली दखल

सीपीआरमध्ये सध्याच्या कामकाजात समन्वय नाही, एकमेकांवर जबाबदारी ढकलली जाते, डयुटी लावण्यावरून प्रचंड मतभेद आहेत, अशा तक्रारी पालकमंत्री पाटील यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. यावर मंगळवारी चर्चाही झाली होती. म्हणून पाटील यांनी बुधवारी सकाळी सीपीआरला भेट देऊन तेथील डॉक्टरांना भावनिक आवाहन केले.

चौकट

आजारपण अंगावर काढू नका

नागरिकांनी आजारपण अंगावर काढू नये. लक्षणे दिसल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले. उशिरा रुग्णालयात दाखल झाल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. लवकर उपचार घेणारा वाचताे, हे लक्षात ठेवण्याची गरज आहे.

चौकट

दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वॉर रूम’

जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांमधील बेडच्या माहितीसह कोरोनाविषयक ताजी माहिती नागरिकांना देण्यासाठी दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वॉर रूम’ सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. सीपीआर किंवा महापालिकेपुरती ही माहिती मिळत आहे. परंतु जिल्ह्यातील एकत्रित माहिती देण्यासाठी येथून काम केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

२१०४२०२१ कोल सतेज पाटील ०१

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी सकाळी सीपीआरमधील सर्व विभागप्रमुखांशी संवाद साधला व कोरोना रुग्णांवर कसे चांगल्या पध्दतीने उपचार करता येतील, याचे नियोजन केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)