शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी राजकारण सोडून विकासाकडे लक्ष द्यावे: हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:53 IST

कोल्हापूर : काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात आम्ही शहरासाठी १२०० कोटींचा विकास निधी आणला. पालकमंत्र्यांकडे दोन नंबरचे खाते असताना गेल्या ...

कोल्हापूर : काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात आम्ही शहरासाठी १२०० कोटींचा विकास निधी आणला. पालकमंत्र्यांकडे दोन नंबरचे खाते असताना गेल्या चार वर्षांत त्यांनी कोल्हापूर शहरासाठी किती निधी आणला, थेट पाईपलाईनच्या परवानग्या अडविल्या आहेत. घोषणेप्रमाणे तीर्थक्षेत्र आराखड्यास निधी द्यावा. त्यांनी राजकारण सोडून शहराच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. महापालिकेची सत्ता मिळत नसल्याचे शल्यही त्यांना बोचत असल्याचे त्यांनी सांगितले.बुधवार पेठ, शनिवार पेठ व शुक्रवार पेठांतील नागरिकांतर्फे रविवारी महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांचा सत्कार मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आदींची प्रमुख उपस्थिती होती. पद्माराजे विद्यालयाच्या पटांगणात सत्कार समारंभ झाला.सतेज पाटील म्हणाले, जीएसटीच्या माध्यमातून उत्पन्न वाढले असेल तर त्या प्रमाणात शहराच्या विकासासाठी पैसे द्या. त्यासाठी राजेश क्षीरसागर यांनी महापौर व उपमहापौर यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी तरीही निधी दिला नाही; तर मात्र महापालिका म्हणून उच्च न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी महापौर निवडीवेळी नगरसेवकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला; पण तो आम्ही हाणून पाडला. पैशांनी माणसे विकत घेता येत नाहीत. हे उद्योग बंद करा, ते खपवून घेणार नाही. आता वर्षभरात तुमची दुकानदारी बंद होणार असल्याची टीका क्षीरसागर यांनी पालकमंत्री पाटील यांचे नाव न घेता केली.महापौर सरिता मोरे यांनी, विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. यावेळी अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, आर. के.पोवार, मारुतराव कातवरे, नंदकुमार मोरे, किरण शिराळे, उमा बनछोडे, प्रतापसिंह जाधव, रविकिरण इंगवले उपस्थित होते.‘मातोश्री’च्या आदेशाची धास्तीमहापौर निवडीत ‘मातोश्री’वरून काय आदेश येतो आणि राजेश क्षीरसागर काय भूमिका घेतात, आमचा घोटाळा उडतो की काय ? याबाबत धास्ती होती, असे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.