शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

पालकमंत्र्यांनी स्वत:ची राजकीय उंची तपासावी- जयवंत शिंपी, मुकुंद देसाई यांचे प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:04 IST

आजरा : २०१९ च्या निवडणुकीत विरोधकांनी वेळ व पैसा घालवू नये म्हणणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैशाशिवाय निवडणुका केल्याच नाहीत.

ठळक मुद्देडी. वाय. पाटील यांच्या साम्राज्यावर टीका नको

 आजरा : २०१९ च्या निवडणुकीत विरोधकांनी वेळ व पैसा घालवू नये म्हणणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैशाशिवाय निवडणुका केल्याच नाहीत. तसेच डॉ. डी. वाय. पाटील यांनी कर्तृत्वाने उभे केलेल्या साम्राज्यावर टीका करण्यापेक्षा मंत्री पाटील यांनी स्वत:ची राजकीय उंची तपासावी, असा टोला आजरा येथील राष्ट्रवादी, काँगे्रस व शिवसेना आघाडीचे प्रमुख जयवंत शिंपी,जिल्हा युवक काँगे्रसचे अध्यक्ष विद्याधर गुरबे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी पत्रकार परिषदेत हाणला.आजरा शहर विकास आघाडीने विजयी मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यात पालकमंत्री पाटील यांनी डॉ. डी. वाय. पाटील व आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत मंत्री पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावरही जोरदार टीका केली. यावेळी गुरबे म्हणाले, मंत्री पाटील हे प्रतिमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यात तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून कोणते प्रोजेक्ट आणले? शेतकºयांसाठी एखादी योजना आणली का? तसेच गरीब मुलांसाठी एखादी शैक्षणिक संस्था काढली नसल्याने त्यांना पाटील घराण्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.शिंपी म्हणाले, तिसºया आघाडीमुळे आमचा पराभव झाला. शहर विकास आघाडीने गेल्या पाच वर्षांत सर्व योजनांचा बोजवारा केला आहे. राजकीय चालीत कमी पडलो असलो तरी यापुढे चुका दुरुस्त करून वाटचाल करणार आहे.मुकुंदराव देसाई म्हणाले, आमच्या नेत्यावर टीका करण्यात वेळ घालविण्यापेक्षा मंत्री पाटील यांनी विजयी मेळाव्यात निधी जाहीर करणे अपेक्षित होते. आमचा चांगल्या कामाला पाठिंबा, तर चुकीच्या कामांना विरोध राहील, असे स्पष्ट केले. याप्रसंगी काँगे्रसच्या महिला जिल्हाध्यक्षा अंजनाताई रेडेकर, तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर, सुधीर देसाई, नगरसेवक संभाजी पाटील, रवी भाटले, आदी उपस्थित होते.महाडिकांनी सोयीचे पक्षीय लेबल थांबवावेकाँगे्रसच्या जिवावर दोनवेळा आमदार झालेले माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी प्रत्येक पक्षाच्या सोयीचे लेबल लावणे थांबवावे. तसेच सोयीच्या राजकारणापेक्षा विकासाच्या बाबतीत बोलावे, असा टोला मारून निवडणुकीत सत्तेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात झाल्याचे गुरबे यांनी सांगितले.