शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'गनिमी काव्याने घेतला मराठा आरक्षणाचा निर्णय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 05:11 IST

मराठा आरक्षण निर्णय होण्याआधीच तो हाणून पाडण्यासाठी काही जण काळे कोट घालून सज्ज होते;

कोल्हापूर : मराठा आरक्षण निर्णय होण्याआधीच तो हाणून पाडण्यासाठी काही जण काळे कोट घालून सज्ज होते; त्यामुळे ‘गनिमी काव्या’नेच आरक्षणाचा निर्णय घेतला. तसेच या आरक्षणाविरोधात कोणी न्यायालयात गेले तरी ते टिकण्यासाठी सरकारच्या वतीने भक्कमपणे बाजू मांडली जाईल, अशी ग्वाही कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली.मराठा आरक्षण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी ‘गनिमी कावा’ करणे गरजेचे होते. आपण व मुख्यमंत्री यांनी रात्रंदिवस या विषयावर काम करून हा निर्णय घेतला. मागासवर्ग आयोगाचा अहवाल पटलावर मांडण्यासाठी आग्रह होत होता; परंतु तो मांडणे अडचणीचे होते. हे आता लोकांच्या लक्षात येईल. हे आरक्षण टिकण्यासाठी न्यायालयात सरकार भक्कमपणे बाजू मांडेल.>नियुक्तीचा मार्ग मोकळागेल्या आरक्षणाच्या कायद्यात स्थगिती मिळण्यास सहा महिने लागले. तोपर्यंत या कायद्याची पुढे अंमलबजावणी करत असताना ४०० जणांना नियुक्ती पत्रे मिळाली, ते आता नोकरी करत आहेत.परंतु त्यांना दर ११ महिन्यांनी न्यायालयात जाऊन म्हणणे सादर करावे लागत होते. ते आता या नवीन कायद्यामुळे करावे लागणार नाही.तसेच ६००० जणांना नियुक्ती पत्रे हातात मिळणे बाकी होते. त्यांनाही ती आता मिळणार आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.