शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘नियोजन’च्या निधीला ‘जीएसटी’चा ब्रेक: कामाचे वेळापत्रक कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:44 IST

कोल्हापूर : बदलणारा जीएसटी आणि ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेमुळे विकासकामांवर निधी खर्च होण्यास चांगलाच ब्रेक लागला आहे. बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नोव्हेंबरअखेर

ठळक मुद्देकर्जमाफीची ३० टक्के कपातआकारणीच्याबाबत संभ्रमाबरोबरच निवडणुकांचाही फटका जिल्ह्यातील निम्म्या गावांच्या निवडणुका असल्याने त्या-त्या गावांतील अनेक प्रस्तावही रखडले

समीर देशपांडे ।कोल्हापूर : बदलणारा जीएसटी आणि ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेमुळे विकासकामांवर निधी खर्च होण्यास चांगलाच ब्रेक लागला आहे. बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नोव्हेंबरअखेर ४२ टक्के खर्च झाल्याचा मुद्दा जोरदार चर्चेत आला होता. एवढा कमी निधी खर्च होण्याच्या कारणांचा ‘लोकमत’ने शोध घेतला. अजूनही काही विभागांना ‘जीएसटी’च्या आकारणीबाबत संभ्रम असल्याने खर्चावर मर्यादा आल्याचे सांगण्यात आले.

नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले की, शासनाच्या सर्व विभागांनी कामांचे प्रस्ताव द्यावेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी मिळून जून-जुलैमध्ये या कामांना आदेश मिळावेत. पूर्ण पावसाळ्यात निविदा प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि पावसाळ्यानंतर कामांना सुरुवात होऊन पुढील वर्षीच्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व विकासकामे पूर्ण व्हावीत, असे ढोबळमानाने नियोजन करण्यात येते. मात्र यंदा जीएसटी या करामुळे गेल्या वर्षी सादर करण्यात आलेल्या, मंजूर करण्यात आलेल्या आणि आदेश देण्यात आलेल्या सर्वच कामांबाबत अडचण निर्माण झाली आहे; कारण संबंधित कामांना किती जीएसटी लागणार आहे, हे स्पष्ट झाल्याशिवाय त्यानुसार आकारणी करणे शक्य नसल्याने या सर्व कामांच्या पुन्हा निविदा काढाव्या लागल्या आहेत. त्यामुळे सर्वच कामांची पुन्हा प्रक्रिया राबवावी लागल्याने त्यामध्ये मोठा वेळ गेला.

जिल्हा नियोजन समितीकडून शासनाच्या विविध विभागांच्या ९६ योजनांना निधी उपलब्ध करून दिला जातो. यातील बहुतांश कामे ही बांधकामाचीच असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे मोठा निधी दिला जातो. या सर्व प्रस्तावांना वेगवेगळ्या टप्प्यांवरील मंजुरी यामध्येही मोठा वेळ गेला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचेही आदेश बदलत गेले. या सगळ्यांमुळे कालापव्यय झाला आहे.पडसाद उमटणारजरी जिल्हा नियोजन समितीमध्ये ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असले तरी हा निधी अपुरा असल्याने त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या १२ डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेमध्ये उमटणार आहेत; कारण एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने एक किलोमीटरला ७० हजार रुपये रस्तादुरुस्तीचा खर्च धरला असला तरी जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा झाल्याने एका किलोमीटरला सव्वादोन लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे केवळ ५०० किलोमीटर रस्त्यांमधील खड्डे भरणे व सीलकोट करणे ही कामे होणार आहेत.मागणी ४०० कोटी... मंजुरी १९० कोटींनाशासनाकडे २०१७/१८ साठी ढोबळमानाने ४०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यांपैकी २४९ कोटी ५२ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला. मात्र ,राज्यातील शेतकºयांना दिलेल्या कर्जमाफीचा परिणाम म्हणून विकासकामांच्या निधीमध्ये ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी हा आराखडा १९० कोटी रुपयांचा झाला; तर सामाजिक न्याय विभागाने १३३ कोटी २० लाखांची मागणी केली होती. त्यात कपात होऊन १३३ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे.गाभा, बिगरगाभा क्षेत्र विगतवारीआराखडा तयार करताना शासनाकडून गाभा आणि बिगरगाभा क्षेत्र असे दोन विभाग केले आहेत. गाभाक्षेत्राला प्राधान्य देण्यात येते. यामध्ये कृषी व संलग्न सेवा, ग्रामविकास, सामाजिक व सामूहिक सेवा, पाटबंधारे व पूरनियंत्रण यांचा समावेश आहे; तर ऊर्जा, उद्योग व खाणकाम, परिवहन, सामान्य सेवा, सामान्य आर्थिक सेवा हे घटक बिगरगाभा क्षेत्रामध्ये येतात.जिल्हा नियोजन समितीकडून शासनाच्या विविध विभागांच्या ९६ योजनांना निधी उपलब्ध करून दिला जातो.आचारसंहितेचाही अनेक गावांना फटकादोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील ४७० ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांची आचारसंहिताही सुरू होती. जवळपास जिल्ह्यातील निम्म्या गावांच्या निवडणुका असल्याने त्या-त्या गावांतील अनेक प्रस्तावही रखडले होते.काही प्रातिनिधिक योजनांच्या खर्चाचा तपशील असायोजनेचे नाव वितरित निधी खर्चित निधीएकात्मिक पाणलोट विकास १ कोटी २० लाख १७ लाख ९३ हजारवन-पर्यटन विकास ५९ लाख ३८ हजार ०००वनक्षेत्रातील मृद व जलसंधारण कामे १ कोटी २१ लाख १६ लाख २९सुशिक्षित बेरोजगारांसाठी साहसी उपक्रम ३४ लाख १ लाख ७७साकव बांधकाम १ कोटी ९४ लाख १ कोटी ४ लाखइतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण १३ कोटी २७ लाख ६ कोटी ४२ लाखआयटीआय वसतिगृह बांधकाम ३१ लाख ३७ हजार ००००विविध विभागांचा निधी अखर्चितमंंजूर निधीच्या ४२ टक्के कामे झाली असली तरी ही फसवी आकडेवारी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री सडक योजनेकडे पैसे वर्ग केले म्हणजे ती कामे झाली असे होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :GSTजीएसटीkolhapurकोल्हापूर