शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

समरजितसिंह घाटगेंकडून गटाची पुनर्बांधणी जोरात

By admin | Updated: January 28, 2017 01:18 IST

अनेक मान्यवरांचा भाजप प्रवेश : नवा पर्याय देण्याचा प्रयत्न

कागल : भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे कागल तालुक्यात १९८०च्या दशकात बलाढ्य असलेल्या राजे गटाचीही पुनर्बांधणी करीत असल्याचे पक्ष प्रवेश कार्यक्रमातून स्पष्ट झाले आहे. खरे तर सध्या तालुक्याच्या राजकारणात ते अजून नवखेच आहेत. तरीही अनेक मान्यवर भाजपमध्ये पर्यायाने राजे गटात प्रवेश करीत असल्याने या गटाचे अस्तित्व आता ठळकपणे समोर येऊ लागले आहे.मंडलिक-घाटगे या दोन राजकीय गटांत कागल तालुका विभागल्यानंतर येथील राजकारण कमालीचे टोकदार आणि संघर्षपूर्ण झाले होते. १९८० ते २००० पर्यंत २० वर्षे हा कट्टर राजकारणाचा कालखंड होता. त्यानंतर सुरुवातीला घाटगे गट, तर नंतर मंडलिक गटात उभी फूट पडून अनुक्रमे संजय घाटगे गट, मुश्रीफ गट आणि मुरगूडकर-पाटील गट असे राजकीय गट तयार झाले. मात्र, राजकीय सत्ता टिकविण्यात विक्रमसिंहराजे गट वगळता सर्वच गट यशस्वी झाले. गटांमध्ये फाटाफूट झाली तरी मंडलिकांची खासदारकी, मुश्रीफांची आमदारकी, संजय घाटगेंची पंचायत समितीची, तर पाटील गटाची गोकुळ, मुरगूडची सत्ता कायम राहिली होती. या पार्श्वभूमीवर सध्या राजे गटाच्या आक्रमकतेला विशेष महत्त्व आहे. त्यातूनच या गटाचे ध्रुवीकरणही झपाट्याने होत आहे.जुन्या घाटगे गटात फूट पडण्याआधी संजय घाटगे, रणजितसिंह पाटील, प्रवीणसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, तसेच उदयबाबा घोरपडेही होते. नगरपालिका निवडणुकीपर्यंत संस्थात्मकृदृष्ट्या किंवा आकडेवारीत राजे गटाचे स्थान चौथ्या क्रमांकाचे होते. आता मात्र, या गटाची पर्यायाने समरजितसिंह घाटगेंच्या नेतृत्त्वाची तालुकाभर चर्चा सुरू आहे. रणजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उदय घोरपडे, धरणग्रस्त संघटनेचे बाबूराव पाटील, मंडलिक साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव इंगळे यांचे चिरंजीव भैया इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते यांचा भाजप प्रवेश झाला आहे. आता हा गट नेमक्या कितव्या स्थानावर पोहोचला आहे, हे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे. तूर्ततरी पक्षप्रवेशाचे काम जोरात सुरू आहे.बडे नेते लक्ष्य : विकासाचा लेखा-जोखासमरजितसिंह घाटगेंनी गेल्या आठवड्यात तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांना लक्ष्य करीत विकासाचा लेखा-जोखा मांडला आहे. तालुक्याच्या विकासावर भाष्य करताना आपण नवा पर्याय देऊ शकतो हे सांगत आहेत. त्यामुळे आमदार मुश्रीफ, प्रा. संजय मंडलिक आणि माजी आमदार संजय घाटगेंनाही आता यावर भाष्य करावे लागणार आहे. कारण विकासाच्या उणिवा ते दाखवित आहेतकागलमध्ये राजकीय भूकंप : घाटगे१९७८ चा राजकीय काळ परत आणायचा आहे. यावेळी कागल तालुक्यात असणारा राजे विक्रमसिंह घाटगे गट पुनर्जीवित करायचा आहे, असे सांगत समरजितसिंह घाटगे म्हणाले, गेल्या २५ वर्षांत राजे गटाचा केवळ वापरच करून घेतला जात आहे; परंतु आता या गटातील दुरावलेला एक-एक कार्यकर्ता एकसंध होत आहे. तसेच येत्या ४८ तासांत कागलमध्ये आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राजे गटात विलीन होणारा तो नेता कोण? या चर्चेला उधाण आले असून, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत..