शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

खरिपातील भुईमूग लागवड किफायतशीर

By admin | Updated: June 14, 2016 00:12 IST

नगदी पीक : महाराष्ट्र, आंध्र, गुजरात, तमिळनाडूसह कर्नाटक राज्यांत लागवड

जमिनीचा पोत आणि मानवाचे आरोग्य सुधारणारे भुईमूग हे पीक शेतीकार्याला निश्चित आर्थिक लाभ मिळवून देणारे हुकमी पीक आहे. देशातील महाराष्ट्र, आंध्र, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांत खरीप हंगामात लागवड केली जाते. भारतात जवळपास नव्वद लाख हेक्टर क्षेत्रांवर, तर त्यापैकी महाराष्ट्रात चार लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी केली जाते. पावसाच्या लहरीपणामुळे महाराष्ट्रात दिवसेंदिवस या क्षेत्रात घट होत आहे. या पिकाची लागवड चांगला निचरा होणारी, सेंद्रिय खतमिश्रित जमिनीवर करावी. जमिनीला नांगरणीच्या चार पाळ्या द्याव्यात. एकरी किमान चार ते पाच ट्रॉली शेणखत द्यावे. त्यात कार्बारील १0 टक्के पंधरा किलो द्यावे. जून ते जुलै महिन्यांत या पिकाची टोकण पद्धतीने सुधारित वाणाची लागवड करावी. पेरणीपूर्व हेक्टरी वीस किलो युरिया, चाळीस किलो स्फुरद किंवा अडीचशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे. पावसाळ्यात हेक्टरी अडीचशे किलो जिप्सम द्यावे. तरीही जमिनीच्या प्रतीनुसार रासायनिक खतांची मात्रा दिल्यास उत्पादनात अधिक वाढ होईल. भुईमुगाच्या सुधारित आणि संशोधित पंचेचाळीस जाती आहेत. यातील योग्य जातीची निवड करावी. चांगले उत्पन्न मिळण्यासाठी बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. यामुळे सुमारे वीस टक्के उत्पादन वाढले जाते. बीजप्रक्रिया करताना रायझोबियम जीवाणूंचा वापर करावा. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बुरशीनाशक चोळावे. पसरी जातीची लागवड केल्यास उपटी जातीपेक्षा अधिक उत्पादन मिळू शकते. तीन ते चार सरी आड एक सरी नांगरीचे खोलगट तास दिल्यास उत्पादनात निश्चितपणे वाढ होते. स्वतंत्रपणे भुईमूग लागवड केल्यास उत्तम, मात्र तसे शक्य नसल्यास मिरची, ऊस, सोयाबीन पिकात भुईमुगाचे आंतरपीक म्हणून लागवड करावी. जमिनीच्या प्रतीनुसार दोन ओळीत ३० किंवा ४५ सेमी अंतर आणि दोन आळ्यांमध्ये १० किंवा १५ सेमी अंतर ठेवावे. पक्वतेसाठी पाने पिवळी पडू लागल्यावर काही शेंगा काढून फोडून पाहाव्यात. टरफल आतील बाजूने काळे पडू लागले की पीक पूर्ण पक्व झाले असे समजावे. काही झाडे उपटून ७५ टक्के शेंगा पक्व झाल्यावर पिकाची काढणी करावी. एकरी सात ते नऊ क्विंटल उत्पादन मिळते.माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भुदरगडचे तालुका कृषी अधिकारी ए. डी. भिंगारदिवे यांनी केले आहे. जिप्सममुळे उत्पादनात भरजिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. हे एक चांगल्या प्रकारचे भूसुधारक आहे. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगला उपयोगी पडतो. जिप्सम वर्षातून एकदा २०० ते ३०० किलो/एकरी जमिनीत टाकावा त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. चोपण जमीन सुधारित जमिनीत रूपांतरित होते; पण शेतकरी त्याचा वापर आपल्या शेतात अत्यल्प प्रमाणात करतात. भुईमुगाचे उत्पादन वाढविण्यात हे विशेष मदत करते.शिवाजी सावंत, गारगोटी