शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सकल मराठा समाजाचा राजकीय पक्ष होणार, आॅक्टोबरअखेर होणार घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 18:49 IST

सर्वच राजकीय पक्षात मराठा नेते असूनही समाजाला आरक्षण मिळत नाही. प्रत्येक पक्ष हा समाजाचा वापर करत आला आहे; यामुळे न्याय्य हक्कासाठी सकल मराठा समाजाचा राजकीय पक्ष स्थापन करण्यात येणार आहे. याची घोषणा आॅक्टोबर अखेर केली जाईल.

ठळक मुद्दे सकल मराठा समाजाचा राजकीय पक्ष होणार, आॅक्टोबरअखेर होणार घोषणासुरेश पाटील यांची माहिती : कोल्हापुरातून होणार राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात

कोल्हापूर : सर्वच राजकीय पक्षात मराठा नेते असूनही समाजाला आरक्षण मिळत नाही. प्रत्येक पक्ष हा समाजाचा वापर करत आला आहे; यामुळे न्याय्य हक्कासाठी सकल मराठा समाजाचा राजकीय पक्ष स्थापन करण्यात येणार आहे. याची घोषणा आॅक्टोबर अखेर केली जाईल. तत्पूर्वी समाजबांधवांची मते आजमावण्यासाठी बुधवारपासून कोल्हापुरातून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली जाईल, अशी माहिती मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील व माजी आमदार सुरेश साळोखे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.सुरेश पाटील म्हणाले, मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे, याकरिता गेले २५ वर्षे विविध मार्गांनी शासनाशी संघर्ष सुरू आहे; परंतु कोणत्याही सरकारने मराठा समाजाची दखल घेतलेली नाही.

५८ मूक मोर्चे काढूनही समाजाच्या पदरात काहीच पडलेले नाही; यामुळे मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्यभर दौरा करून मराठा समाजबांधव व संघटनांशी चर्चा केली जाणार आहे. पक्षबांधणीची सुरुवात कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे उद्या, बुधवारी सकाळी ११.३० वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन होणार आहे.सुरेश साळोखे म्हणाले, पक्ष स्थापन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. राज्यभर दौरा करून समाजबांधवांची मते आजमावून घेतली जाणार आहेत. मराठा समाजातील नवी पिढी नक्कीच या पक्षासोबत राहील.यावेळी बाळ घाटगे, राजू सावंत, परेश भोसले, भरत पाटील, वैशाली जाधव, राहुल इंगवले, सतीश पाटील, संतोष कांदेकर, आदी उपस्थित होते.

गणेश मंडळांनी मराठा आरक्षणाचा फलक लावावागणेशोत्सवात सर्व गणेश मंडळांनी मराठा आरक्षणाला पाठिंब्याचे फलक लावावे, जेणेकरून या आंदोलनाची धग कायम राहील, असे आवाहन सुरेश साळोखे यांनी केले. 

 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर