केनवडे (ता.कागल ) येथील अन्नपूर्णा शुगर ॲण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विष्णुपंत गायकवाड होते. ए.वाय.पाटील म्हाकवेकर व त्यांच्या पत्नी रंजना पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न झाला. जिल्हा परिषद सदस्य अंबरिशसिंह घाटगे, धनराज घाटगे,आप्पासाहेब पाटील म्हाकवेकर, काकासाहेब सावडकर, संचालक शिवसिंग घाटगे, के.के.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास जि. प. सदस्य नाना कांबळे, ज्ञानदेव पाटील, भैरु कोराने (माऊली ), बाजीराव पाटील केनवडेकर, ज्ञानदेव जाधव (फौजी ), अरुण तोडकर, पप्पू पोवार, उत्तम वाडकर, सुरेश मर्दाने, भगवान पाटील,राजेश भराडे उपस्थित होते. अरुण तोडकर यांनी आभार मानले.
फोटोओळ- केनवडे : येथील अन्नपूर्णा साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन ए. वाय.पाटील म्हाकवेकर व त्यांच्या पत्नी रंजना पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन संजयबाबा घाटगे,अरुंधती घाटगे, जिल्हा परिषद सदस्य अंबरीशसिंह घाटगे,बाजीराव पाटील व अन्य मान्यवर.