शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलिक, ग्रामविकास ...

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलिक, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आदी मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मस्थळ ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, इतिहास संशोधक, शाहू प्रेमी व मान्यवर उपस्थित होते.

दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पालकमंत्री पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खासदार मंडलिक, माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, आमदार जयंत आसगावकर, समरजीत घाटगे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट

महापालिकेतर्फे शाहू महाराज जयंती साजरी

महापालिकेतर्फे लक्ष्मी विलास पॅलेस (कसबा बावडा) येथील जन्मस्थळातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस आणि दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळ, महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहातील शाहू महाराज यांच्या अर्धपुतळ्यास प्रशासक डॉ. बलकवडे यांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री पाटील, ग्रामविकासमंत्री मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार मंडलिक, आमदार जाधव, ऋतुराज पाटील, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे, चेतन कोंडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उप-शहर अभियंता हर्षजीत घाटगे, नारायण भोसले, माजी नगरसेवक राजेश लाटकर, आदिल फरास, अशोक जाधव, संदीप नेजदार, सुभाष बुचडे, सत्यजीत कदम, सुनील कदम, माजी नगरसेविका माधुरी लाड, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, कादर मलबारी, गणी आजरेकर, बाबा पार्टे आदी उपस्थित होते.

फोटो : २६०६२०२१-कोल- अभिवादन

कोल्हापुरातील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, आमदार जयंत आसगावकर, समरजीत घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते.