कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग पेटवणाऱ्या राजमाता जिजाऊंची जयंती मंगळवारी काेल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील विविध संस्था, संघटना व पक्षांच्यावतीने जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मावळा कोल्हापूर यांच्यावतीने मिरजकर तिकटी येथे जिजाऊंच्या भव्य छायाचित्राचे पूजन आमदार चंद्रकांत जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उमेश पवार, विनोद साळोखे, रामदास पाटील, अमोल गायकवाड, सचिन दामुगडे, अनिकेत घाटगे, सतीश जाधव, प्रशांत जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मंगळवार पेठेतील चाणक्य मित्रमंडळाच्यावतीने सकाळी नऊ वाजता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिर घेण्यात आले.
पद्माराजे संवर्धन समिती
शिवाजी पेठेतील पद्माराजे संवर्धन समितीच्यावतीने महिला सफाई कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ लाखाच्या विमा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. माजी खासदार निवेदिता माने यांनी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असणारी महिला आजच्या पिढीची जिजाऊच आहे, असे गौरवोदगार काढले. यावेळी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या संचालिका सविता पाटील, गीता डाकवे, कल्पना मोरे, शोभा तांबट, आरती वाळके यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर परिसरातील पंधराहून अधिक ज्येष्ठ महिलांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राधिका पाटील, सरिता सासने, स्मिता हराळे, गीता भोसले, शर्मीला भोसले यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
--
१२०१२०२१-कोल-जिजाऊ जयंती पद्माराजे समिती
फोटो ओळी : जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून पद्माराजे संवर्धन समितीच्यावतीने माजी खासदार निवेदिता माने यांच्याहस्ते महिला सफाई कर्मचाऱ्यांना विमा प्रमाणपत्र देण्यात आले.
---
शेतकरी कामगार पक्ष
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीतर्फे अध्यक्षा ॲड. उज्वला कदम यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी प्रिया जाधव, गीता वाघमारे, बाबूराव कदम, दिलीपकुमार जाधव, संग्राम माने, आशिष चिले, मधुकर हरेल, मोहन पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्र हायस्कूल
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित महाराष्ट्र हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक ए. एस. रामाणे यांच्याहस्ते स्वामी विवेकानंद व ज्येष्ठ शिक्षिका एस. एस. ठोंबरे यांच्याहस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी उपमुख्याध्यापक ए. एन. जाधव, पर्यवेक्षक यु. एम. पाटील, के. ए. ढगे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
न्यू प्राथमिक विद्यालय
शाळेच्या मुख्याध्यापिका एस. आर. पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी शाळेत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. ऑनलाईन तासाच्यावेळेत जिजाऊंच्या कार्याची माहिती देण्यात आली.
--
फोटो नं १२०१२०२१-जिजाऊ जयंती मावळा
ओळ : मावळा कोल्हापूर यांच्यावतीने मिरजकर तिकटी येथे जिजाऊंच्या भव्य छायाचित्राचे पूजन आमदार चंद्रकांत जाधव यांच्याहस्ते करण्यात आले.