शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांना अभिवादन, कोविड योद्ध्यांना सलाम,श्रद्धादीपांचे प्रज्वलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 10:49 IST

Indian Army Kolhapur- श्रद्धादीप प्रज्वलन, देशभक्तिपर गीते, ह्यमशाल रॅलीह्ण अशा भावपूर्ण वातावरणात कोल्हापूरकरांनी शुक्रवारी शहिदांच्या स्मृतींना अभिवादन केले, तर कोविड योद्ध्यांना सलाम केला. वीर जवान अभिजित सूर्यवंशी यांचा २० वा स्मृतिदिन आणि जीवनमुक्ती सेवा संस्थेचा (व्हाईट आर्मी) २१व्या वर्धापनदिनानिमित्त शहीद दिन कार्यक्रम घेण्यात आला.

ठळक मुद्देशहिदांना अभिवादन, कोविड योद्ध्यांना सलाम,श्रद्धादीपांचे प्रज्वलन बिंदू चौकात दुमदुमली देशभक्तिपर गीते

कोल्हापूर :श्रद्धादीप प्रज्वलन, देशभक्तिपर गीते, ह्यमशाल रॅलीह्ण अशा भावपूर्ण वातावरणात कोल्हापूरकरांनी शुक्रवारी शहिदांच्या स्मृतींना अभिवादन केले, तर कोविड योद्ध्यांना सलाम केला. वीर जवान अभिजित सूर्यवंशी यांचा २० वा स्मृतिदिन आणि जीवनमुक्ती सेवा संस्थेचा (व्हाईट आर्मी) २१व्या वर्धापनदिनानिमित्त शहीद दिन कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात प्रारंभी वीर जवान अभिजित सूर्यवंशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी सातच्या सुमारास ॲड. धनंजय पठाडे, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव, शाहीर राजू राऊत, व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मशाल रॅलीचा प्रारंभ झाला.

बिंदू चौक, शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे रॅली पुन्हा बिंदू चौकात आली. त्यानंतर विद्यार्थी, नागरिकांच्या हस्ते दीड हजार श्रद्धादीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार, आदी कोविड योद्ध्यांना सलाम करण्यात आला. विनायक भाट, सुमित साबळे, प्रेम सातपुते, हिना यादवाड, डॉ. हर्षवर्धन जगताप, सिद्धेश पाटील, प्रशांत शेंडे, आदी कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जयेश ओसवाल, हर्षेल सुर्वे, शाहीर दिलीप सावंत, ऐश्वर्या मुनीश्वर, प्रकाश गाताडे, डॉ. अंजना जाधव, अरविंद देशपांडे, अजित सातपुते, विजया रोकडे, कस्तुरी, राजेश्वरी आणि शर्वरी रोकडे, चंद्रहार पाटील, डॉ. शीतल पाटील, बंडा साळोखे, आदी उपस्थित होते. प्रकाश सुतार यांनी सूत्रसंचालन केले.कोविड योद्धा संदेशया कार्यक्रमात श्रद्धादीप प्रज्वलित करून ह्यकोविड योद्धाह्ण असा संदेश देण्यात आला. शाहीर राजू राऊत यांनी ऐतिहासिक बिंदू चौकाच्या तटबंदीची महती सांगितली. राजेंद्र कोरे, सागर मौर्य, अमरसिंह संघर्षे यांनी सादर केलेल्या कर चले हम फिदा, मेरा कर्मा तू..., भारत हमको जानसे प्यारा है, आदी देशभक्तिपर गीतांनी परिसर दुमदुमला. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानkolhapurकोल्हापूर