शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

क्रांतिज्योत मिरवणुकीने हुतात्म्यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 21:23 IST

कोल्हापूर : ‘भारतमाता की जय...’, ‘वंदे मातरम्,’, ‘इन्कलाब झिंदाबाद’, ‘आॅगस्ट क्रांतिदिन चिरायू होवो’ अशा घोषणा देत क्रांतिज्योत मिरवणुकीद्वारे कोल्हापूरकरांनी मंगळवारी हुतात्म्यांना अभिवादन केले. आॅगस्ट क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे ही क्रांतिज्योत मिरवणूक काढण्यात आली.देशाच्या स्वातंत्र्यासाठी आॅगस्ट १८५७ मध्ये बंड केलेल्या वीरांना हौतात्म्य प्राप्त झाले. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा ...

ठळक मुद्देनेताजी सुभाषचंद्र बोस चौक घोषणांनी दुमदुमला; हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेचा उपक्रम हुतात्मा क्रांतिस्तंभासमोर ‘वंदेमातरम्’ने मिरवणुकीची सांगता झाली

कोल्हापूर : ‘भारतमाता की जय...’, ‘वंदे मातरम्,’, ‘इन्कलाब झिंदाबाद’, ‘आॅगस्ट क्रांतिदिन चिरायू होवो’ अशा घोषणा देत क्रांतिज्योत मिरवणुकीद्वारे कोल्हापूरकरांनी मंगळवारी हुतात्म्यांना अभिवादन केले. आॅगस्ट क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे ही क्रांतिज्योत मिरवणूक काढण्यात आली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आॅगस्ट १८५७ मध्ये बंड केलेल्या वीरांना हौतात्म्य प्राप्त झाले. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेने सुरू केलेल्या क्रांतिज्योत मिरवणुकीच्या परंपरेचे यंदाचे ३९ वे वर्षे आहे. मिरजकर तिकटी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे सायंकाळी सहाच्या सुमारास महापौर हसिना फरास यांच्या हस्ते क्रांतिज्योत प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथून ही मिरवणूक निघाली. महापौर हसिना फरास यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर यामध्ये सहभागी झाले. ‘भारतमाता की जय...,’ ‘आॅगस्ट क्रांतिदिन चिरायू होवो’ अशा घोषणांनी मिरवणूक मार्ग दुमदुमून निघाला. बिनखांबी गणेश मंदिर, खरी कॉर्नर, दैवज्ञ बोर्डिंगमार्गे मिरजकर तिकटी येथील हुतात्मा क्रांतिस्तंभासमोर ‘वंदेमातरम्’ने मिरवणुकीची सांगता झाली. भालकर्स अकादमीच्या विद्यार्थिनी कथकल्ली नृत्यांगनांच्या वेशभूषेत, तर चाटे शिक्षण समूहाचे विद्यार्थी सैनिकाच्या वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी झाले होते.

या मिरवणुकीत परिवहन समितीचे सभापती नियाज खान, नगरसेविका सुनंदा मोहिते, चाटे शिक्षण समूहाचे कोल्हापूर विभागीय संचालक प्रा. भारत खराटे, इनरव्हील क्लबच्या पद्मजा श्ािंदे, रोटरी क्लब आॅफ कोल्हापूरचे अध्यक्ष सुभाष कुत्ते, माजी नगरसेवक आदिल फरास, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, किसन कल्याणकर, श्रीधर कुलकर्णी, संजय पोवार, अनिल कोळेकर, संभाजीराव जगदाळे, बाबा सावंत, अ‍ॅड. विनायक मोहिते-पाटील, शिवाजीराव ढवण, अजित सासने, सुरेश पोवार, बाबूराव चव्हाण, किशोर घाटगे, अशोक पोवार, सुमित खानविलकर, सुनील पाटील, शीतल नलवडे, गुरुदत्त म्हाडगुत, श्रीकांत मनोळे, चाटे शिक्षण समूहाचे विद्यार्थी, शिक्षक, इनरव्हील आणि रोटरी क्लबचे सदस्य सहभागी झाले होते. पद्माकर कापसे यांनी स्वागत केले. रामेश्वर पत्की यांनी सूत्रसंचालन केले.मुस्लिम बोर्डिंगतर्फे आदरांजलीदि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग) आणि नेहरू हायस्कूलतर्फे क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर ‘भारतमाता की जय’, ‘शहीद जवान अमर रहे’, आदी घोषणांनी परिसर दणाणून निघाला. यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, नेहरू हायस्कूल कमिटीचे चेअरमन हमजेखान श्ािंदी, उपाध्यक्ष आदिल फरास, संचालक अल्ताफ झांजी, रफिक मुल्ला, शब्बीर पटवेगार, बाबासो गवंडी, नौशाद मोमीन, खलील मुजावर, बापूसो मुल्ला, महंमद हनिफ थोडगे, इलाई बांगी, रफिक शेख उपस्थित होते.