कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना १४७ व्या जयंतीदिनी सर्वच स्तरातून अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने प्रतिमा पूजन, पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करणे यासह विविध समाजोपयोगी उपक्रमही राबविले गेले.
जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था येथे अध्यक्ष राहुल माणगावकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी रणजित वडणगेकर, रघुनाथ मांडरे, प्रकाश पोवार, नंदकुमार कांबळे उपस्थित होते.
मिलिंद हायस्कूल, प्रतिभानगर येथे मुख्याध्यापक एम. एम. शिर्के यांच्या हस्ते शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विभागप्रमुख बी. एम. नदाफ यांच्यासह शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.
शाहूनगर येथे मनसेचे शहर उपाध्यक्ष सुरेंद्र तिळवे यांनी पुष्पहार अर्पण करुन शाहू महाराजांना अभिवादन केले. यावेळी प्रशांत अवघडे, धनाजी सकटे, दावीद भोरे, राहुल सोनटक्के, नंदू सोनटक्के, आकाश सांगावकर, रणजित साठे उपस्थित होते.
राममनोहर लोहिया पतसंस्था येथे संस्थेचे अध्यक्ष व्यंकाप्पा बोसले यांनी शाहूंच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सुनील भोसले, देवेंद्र भोसले, श्रीधर माळगे, गणेश घुणकीकर, रेखा मादर उपस्थित होते.
आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित वालावलकर हायस्कूल येथे उपमुख्याध्यापक बाळाराम लाड यांनी शाहू प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मुख्याध्यापक महावीर मुडबिदीकर, संजय सौंदलगे, संतोष पोवार, वृषाली कुलकर्णी, नंदा बनगे, बाळासो कागले, दिनकर शिंत्रे उपस्थित होते.
जयभारत हायस्कूल येथे हायस्कूलचे प्रयोगशाळा परिचर कृष्णा तेलवेकर यांनी प्रतिमापूजन केले. सहाय्यक शिक्षक व्ही. एन. कांबळे यांनी शाहूंचे विचार मांडले. यावेळी मुख्याध्यापक अश्विनी पाटील, अरुण कुंभार, एम. वाय. निकाडे, एस. एम. काळे उपस्थित होते.
कृषी कर्मचारी पतसंस्था येथे प्राधिकृत अधिकारी संदीप शिंद व माजी सभापती शशिकांत चपाले यांच्या हस्ते शाहूंच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी नामदेव चव्हाण, योगेश काेळेकर, बाळासाहेब ठोंबरे, दिलीप नाटेकर, प्रमोद खोपडे उपस्थित होते.
हिंदू महासभेतर्फे मनोहर सोरप यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हाप्रमुख रेखा दुधाणे, राजेंद्र शिंदे, शहर अध्यक्ष जयवंत निर्मळ उपस्थित होते.
बेघर निवारा : एकटी व मनपाद्वारे संचलित लक्ष्मीपुरीतील बेघर निवारा केंद्रात झाडाला पाणी घालून शाहूंना अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष अनुराधा भोसले, पूजा शिंदेश, अभिजीत कांबळे, अजय कांबळे, दीपाली सटाले, पुष्पा कांबळे, जगदीश कांबळे यावेळी उपस्थित होते.
बौध्द अवशेष विचार संवर्धन समितीतर्फे शाहू जन्मस्थळ व समाधीस्थळी जाऊन शाहूंना अभिवादन करण्यात आले. यावेळी बापूसाहेब कांबळे, स्वाती काळे, सुरेश कांबळे, विद्याधर कांबळे, दीपक कांबळे उपस्थित होते.
महाराष्ट्र कामगार कर्मचारी महासंघ यांच्यातर्फे दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अध्यक्ष फरजाना नदाफ, शबाना मुजावर, राणी गायकवाड यांनी अभिवादन केले. यावेळी संजय गुदगे, समाधान बनसोडे, अर्जुन वाघमारे, भारत कोकाटे उपस्थित होते.
समृध्दी महिला सामाजिक संस्था, सिध्दार्थनगर येथे जयंतीचे औचित्य साधून शाहू समाधीस्थळी भेट देणाऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात स्वाती काळे, भारती पन्हाळकर, संगीता बनगे, आरती काळे, विद्या कांबळे, अश्विनी कांबळे, सीमा कांबळे यांनी सहभाग घेतला.