शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

फुटबॉल चाहत्यांची घोर निराशा, अर्जेंटिना, पोर्तुगाल बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 01:04 IST

कोल्हापूर : रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाचा मेस्सी आणि पोर्तुगालचा रोनॉल्डो या दोन स्टार खेळाडूंची जादू चालली नाही. त्यामुळे या दोन्ही संघांचा पराभव या दोन खेळाडूंच्या चाहत्यांच्या मनाला पटला नाही. मात्र, दोन्ही संघही स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळे या चाहत्यांची घोर निराशा झाली. अनेकांना नाराजी लपविता आली नाही.अर्जेंटिनाचा मेस्सी, ...

कोल्हापूर : रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाचा मेस्सी आणि पोर्तुगालचा रोनॉल्डो या दोन स्टार खेळाडूंची जादू चालली नाही. त्यामुळे या दोन्ही संघांचा पराभव या दोन खेळाडूंच्या चाहत्यांच्या मनाला पटला नाही. मात्र, दोन्ही संघही स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळे या चाहत्यांची घोर निराशा झाली. अनेकांना नाराजी लपविता आली नाही.अर्जेंटिनाचा मेस्सी, पोर्तुगालचा आघाडीवीर रोनॉल्डो ख्रिस्तिनो, ब्राझीलचा नेमार यांचा चाहता वर्ग कोल्हापूरच्या पेठापेठांमध्येही आहे. यात शनिवारी (दि. ३०) अर्जेंटिनाचा फ्रान्सने ४-३ असा पराभव केला. यात लिओनिल मेस्सीला एकही गोल नोंदवता आला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत मेस्सी जादू करील आणि अर्जेंटिना बरोबरी साधेल असा कयास होता. मात्र, शेवटपर्यंत काही बरोबरी झाली नाही. यासह पोर्तुगालवरही उरुग्वेने २-१ अशी मात केली. यातही स्टार खेळाडू रोनॉल्डोला करिश्मा करता आला नाही. त्यामुळे जगभरासह कोल्हापुरातील तमाम चाहता वर्गही नाराज झाला; कारण गेल्या दोन महिन्यांपासून या दोन खेळाडूंची छायाचित्रे कोल्हापुरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, जुना बुधवार पेठ, उत्तरेश्वर, आदी फुटबॉल खेळणाऱ्या संघांच्या समर्थकांकडून पोस्टररूपाने सर्वत्र झळकत होती. त्यामुळे अगदी टिपेला पोहोचलेला विश्वचषक फुटबॉलचा ज्वर अशा रीतीने उतरेल असे वाटले नव्हते. यात जादूई खेळी पाहण्यास मिळेल ही चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, या स्टार खेळाडूंनी घोर निराशा केली. आता ब्राझीलच्या नेमारच्या खेळीकडे सर्व कोल्हापूरकर फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शनिवारच्या हाय व्होल्टेज सामन्यात चाहत्या देशांचे आव्हान संपुष्टात आल्याने त्याची चर्चा रविवारी दिवसभर या चाहत्या मंडळींत होती. सोशल मीडियाद्वारे मेस्सी, रोनॉल्डो कसे चुकले, कोणत्या प्रतिस्पर्धी खेळाडूने त्यांना कसे रोखले याबद्दलची चर्चा दिवसभर रंगली होती. आता स्पर्धेतील ब्राझील, उरुग्वे, फ्रान्स यांच्यातील खेळाडूंकडे कोल्हापूरकर चाहते वळले आहेत.