शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सरकी तेलाची उसळी; डाळीही वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:58 IST

भाजीपाला स्थिर : डाळींच्या दरातही किलोमागे दोन ते तीन रुपयांची वाढकोल्हापूर : सरकी तेलावर तब्बल १४ टक्के जादा कराची आकारणी सुरू केल्याने दराने चांगलीच उसळी घेतली आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो ८२ रुपये दर राहिला असून किरकोळमध्ये तो ९० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गतआठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले आहेत. तूरडाळ, ...

भाजीपाला स्थिर : डाळींच्या दरातही किलोमागे दोन ते तीन रुपयांची वाढकोल्हापूर : सरकी तेलावर तब्बल १४ टक्के जादा कराची आकारणी सुरू केल्याने दराने चांगलीच उसळी घेतली आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो ८२ रुपये दर राहिला असून किरकोळमध्ये तो ९० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गतआठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले आहेत. तूरडाळ, हरभरा डाळीच्या दरात मात्र थोडी वाढ झाली आहे.शेंगतेलाचे दर पाहता सामान्य ग्राहक सरकी, पामतेल खरेदीकडेच अधिक वळतो. साधारणत: हे तेल सामान्यांच्या आवाक्यात असतात; पण सरकारने तेलावर तब्बल १४ टक्के करआकारणी सुरू केल्याने दर चांगलेच भडकले आहेत. सरकी तेलाने ८० रुपयांवरून ९० रुपयांपर्यंत उसळी घेतली असून सामान्य माणसाला चांगलाच चटका बसत आहे. हरभरा डाळ, तुरडाळीच्या दरात थोडी वाढ होत आहे. सरासरी किलोमागे दोन-तीन रुपयांची वाढ दिसत आहे. खोबरे, शाबू, साखरेच्या दरात फारशी चढ-उतार नाही.भाजीपाल्याची आवक चांगली आहे, त्यात स्थानिक कोबी, फ्लॉवर, वांगी, दोडका, गवारची आवक सुरू असल्याने दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. कोबीचा गड्डा पाच रुपये तर वांगी वीस रुपये किलोपर्यंत आहेत. पालेभाज्यांची आवकही वाढली आहे. मेथी, पोकळा पेंढी पाच रुपये आहे. विविध फळांची रेलचेल वाढली असून चिकू, सफरचंद, द्राक्षांची आवक जास्त आहे. उन्हाचे चटके वाढल्याने कलिंगडाची मागणी वाढली आहे, आवकही चांगली असल्याने बाजारात कलिंगडेचे ढीग पाहावयास मिळत आहेत.टोमॅटो तीन रुपयांपर्यंत!टोमॅटोची आवक कमालीची वाढली आहे. बाजार समितीत रोज अडीच हजार कॅरेट आवक होते पण उठाव नसल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. घाऊक बाजारात १ ते ५ रुपये किलो तर किरकोळ बाजारात लालभडक टोमॅटोचा दर आठ रुपये किलो राहिला आहे.हापूसची आवक सुरू : बाजार समितीत हापूस आंब्यांची आवक हळूहळू वाढत आहे. घाऊक बाजारात सरासरी ३२५० रुपये पेटी, तर ९०० रुपये बॉक्सचा दर आहे. पायरी आंब्याचा दर ५०० रुपये बॉक्स आहे.