शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

यळगूडमध्ये कडकडीत बंद

By admin | Updated: September 14, 2015 00:18 IST

अतिक्रमण निर्मूलन वाद : चुकीच्या गुन्ह्यांचा निषेध; सरपंच, सदस्यांविरोधात गुन्हे

हुपरी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील अंबाबाईनगर वसाहतीमध्ये घराचे बेकायदा बांधकाम थांबविण्यासाठी गेलेल्या सरपंच वंदना दादासो पाटील, उपसरपंच सुभाष गोटखिंडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांना मिरचीपूड टाकून मारहाण झाली होती; मात्र त्यांच्यावरच चुकीच्या पद्धतीने हुपरी पोलिसांत विविध गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ रविवारी यळगूडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही गटांच्या १८ जणांविरोधात विनयभंग, चोरी, मारहाण अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत; मात्र कोणालाही अटक झाली नाही. सरपंच वंदना पाटील, उपसरपंच सुभाष गोटखिंडे, सत्ताधारी गटाचे नेते आण्णासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य शीतल बागल, वसंत शिंदे, अझहर मुल्लाणी तसेच दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासो दबडे, हुपरी शहरप्रमुख सुनील कोरे, ज्योती गणेश रजपूत, नौतान मिणेकर, छनौ रावळकर, कुंदन नवले, गणेश रजपूत, राहुल परकारे, सुनील घस्ते, सुभाष रजपूत, सारिका व सुरेश (पूर्ण नाव समजू शकले नाही) अशा दोन्ही गटांच्या १८ जणांचा यामध्ये समावेश आहे. सरपंच वंदना पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे की, अंबाबाईनगर वसाहतीमध्ये गणेश सुभाष रजपूत यांनी गट नंबर २८१ मध्ये बेकायदेशीररीत्या सुरूकेलेले घराचे बांधकाम थांबविण्यासाठी आम्ही गेलो, त्यावेळी गणेश व ज्योती रजपूत यांनी आपल्या नातेवाइकांसह आमच्यावर मिरचीपूड टाकून हल्ला केला, तर ग्रामपंचायत महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करून त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आहे. ज्योती गणेश रजपूत यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, झोपडीच्या दुरुस्तीचे काम करीत असताना सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी आमच्याशी वाद घालून काम थांबविले व आम्हाला मारहाण केली. आण्णासो पाटील व सदस्य वसंत शिंदे यांनी विनयभंग केला.