शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा शाळकरी मुलांना मारहाण करुन लुटले

By admin | Updated: February 4, 2017 19:32 IST

शाळकरी मुलांना तिघा लुटारुंनी मारहाण करुन चाकुचा धाक दाखवून चार मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेत पोबारा केला.

ऑनलाइन लोकमत 
कोल्हापूर, दि. 4 - दहावीचा निरोप समारंभ कार्यक्रम आवरुन घरी जाणा-या चौघा शाळकरी मुलांना तिघा लुटारुंनी मारहाण करुन चाकुचा धाक दाखवून चार मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेत पोबारा केला. शनिवारी भरदिवसा साडेअकराच्या सुमारास मेरी वेदन मैदानावरील फुटपाथवर ही घटना घडली. भयभित झालेल्या मुलांनी घरी जावून कुटूंबियांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 
 
पोलिस निरीक्षक प्रविण चौगुले यांनी मुलांनी लुटारुंचे सांगितलेले वर्णन आणि सीसीटीव्ही फुटेजवरुन विचारेमाळ येथील तिघांना अवघ्या पाच तासात अटक केली. चैनीसाठी लुटमार केल्याची त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी सांगितले, अभिषेक अजित वाळवेकर (वय १६), श्रावण यशवंत शेट्टी (१६), प्रथमेश संजय सुर्वे (१६), प्रणव शैलेंद्र गाडेकर (१६, सर्व रा. रमणमळा, कसबा बावडा) हे चौघे सेंट झेवियर्स स्कुलमध्ये दहावीमध्ये शिकतात. शनिवारी त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर हे चौघे चालत घरी निघाले होते. मेरी वेदन मैदानासमोरील फुटपाथवरुन जात असतांना पाठिमागून मोटरसायकलवरुन तिघे तरुण आले. त्यांनी या चौघांना अडवून थेट मारहाण केली. अचानक घडलेल्या प्रकाराने चौघेही बिथरुन गेले. तिघापैकी एका तरुणाने चाकु दाखविताच भितीने तिघेही थरथरले. यावेळी चौघाच्या खिशातील मोबाईल व पैसे काढून त्यांनी पलायन केले. 
 
या रस्त्यावरुन वाहनधारकांची ये-जा सुरु होती. त्यांच्या समोरच हा प्रकार घडला. मारहाण होत असतांना मुलांकडे विचारपूस करण्याचे धाडस कोणीही केले नाही. चौघाही मुलांचे अंग भितीने घामाघुम झाले होते. त्यांनी तेथून थेट घर गाठले. घडलेला प्रकार आई-वडीलांना सांगितला. त्यानंतर चौघांचेही पालक शाहूपुरी पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिस निरीक्षक प्रविण चौगुले यांची भेट घेवून माहिती दिली. भरदिवसा या रस्त्यावर लुटमार झाल्याने पालक वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.