शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील ६० हजार कामगारांना अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:03 IST

दत्तात्रय पाटील ।म्हाकवे : राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाºया आणि शासन दरबारी नोंदीत असणाºया कामगारांना त्यांना आवश्यक साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, तर आता या कामगारांच्या आरोग्याची सुरक्षा राहावी यासाठी त्यांना सुरक्षा संच (सेफ्टी किट) पुरविण्यात येणार आहे.बांधकाम कामगारांना कोणतीही ...

ठळक मुद्देबांधकाम कामगारांना सुरक्षा संच : साहित्य खरेदीसाठी पाच हजार मिळणार; कामगार संघटनेच्या प्रयत्नाला यशसंपूर्ण कुटुंबाला ‘कवचकुंडले’ वाटणारी ‘मेडिक्लेम’ योजना भाजप सरकारने बंद केली

दत्तात्रय पाटील ।म्हाकवे : राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाºया आणि शासन दरबारी नोंदीत असणाºया कामगारांना त्यांना आवश्यक साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, तर आता या कामगारांच्या आरोग्याची सुरक्षा राहावी यासाठी त्यांना सुरक्षा संच (सेफ्टी किट) पुरविण्यात येणार आहे.

बांधकाम कामगारांना कोणतीही दुखापत अथवा जीवितहानी होऊ नये यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने बांधकाम कामगार वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. सुरक्षा संचामध्ये हेल्मेट, सुरक्षा जॅकेट, हॅँडग्लोज, आदींचा समावेश आहे.महाराष्टÑ इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सुमारे तीन लाख बांधकाम कामगार नोंदीत आहेत.

यामध्ये सर्वाधिक कोल्हापूर जिल्ह्यात ६० हजार कामगार नोंदीत आहेत. या कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान वाटप थेट त्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शासन स्तरावरून मंजूर होणाºया विकासकामांच्या निधीपैकी एक टक्का निधी या कामगार मंडळाकडे वर्ग होतो. सध्या मंडळाकडे कोट्यवधीचा निधी जमा आहे. त्यामुळे या निधीतून बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लाल बावटा कामगार संघटनेने गेल्या तीन वर्षांत तब्बल १६ वेळा आंदोलने, मोर्चे काढले.गवंडी, सुतार, लोहार, फरशी पॉलिश, फरशी कटिंग, प्लंबर, सेंट्रिंग यासह त्यांच्यासोबत असणारे मजूर यांची शासनाकडे नोंद झाली आहे. या कामगारांना आरोग्य विमा योजना, साहित्य खरेदी अनुदान, त्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षणापासून उच्चशिक्षणासाठी अनुदान, महिला कामगारांना डिलिव्हरीसाठी अनुदान देण्याच्या योजना शासनाने राबविल्या आहेत.

मात्र, २०१४ पासून या कामगारांसाठी एकाही योजनेचा प्रत्यक्ष लाभ शासनाने दिलेला नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. संघटनेच्या माध्यमातून या कामगारांनी जिल्हाधिकाºयांसह पालकमंत्र्यांचे निवासस्थान, मंत्रालय, कामगार आयुक्त, विविध अधिवेशनामध्ये तसेच राज्यव्यापी रास्ता रोको करून शासनविरोधात बंड पुकारले. गेल्या दोन वर्षांत या कामगारांनी तब्बल १६ वेळा आंदोलने केली. या संघर्षाचे फलित म्हणून या कामगारांना साहित्य खरेदीसाठी पाच हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाला घेणे भाग पडले.कुटुंबातील एकालाच लाभसलग तीन वर्षे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत असणाºया कामगारांनाच साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी पाच हजारांचा लाभ देण्यात येणार आहे. या अनुदानातून संंबंधित कामगारांनी त्यांना आवश्यक खोरे, टिकाव, पाटी, हातोडा, बूट, थापी, सडा, आदी साहित्य खरेदी करावयाचे आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला हे अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया कामगार आयुक्त कार्यालयातून सुरू झाली आहे.‘मेडिक्लेम’ योजना सुरू करा : लाल बावटाकामगारांना साहित्य खरेदीसाठी अनुदान आणि सुरक्षा संच देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु हा निर्णय म्हणजे दुधाची तहान ताकावर भागविण्याचाच प्रकार आहे. बांधकाम कामगारांच्या संपूर्ण कुटुंबाला ‘कवचकुंडले’ वाटणारी ‘मेडिक्लेम’ योजना भाजप सरकारने बंद केली आहे. त्यामुळे मेडिक्लेम योजना पूर्ववत करण्यासाठी बांधकाम कामगार आंदोलन उभे करणार आहे, अशी प्रतिक्रिया लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे व जिल्हा सचिव शिवाजीराव मगदूम-सिद्धनेर्लीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.