शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

दादा, सत्ता गेल्यावर कार्यकर्ते शोधाल

By admin | Updated: January 9, 2017 01:04 IST

हसन मुश्रीफ यांचा पलटवार : पक्ष सोडणाऱ्यांचे भले होणार असेल, तर त्यांना शुभेच्छा!

कोल्हापूर : गेली पंधरा-वीस वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रांत एकत्र काम केलेली जिवाभावाची माणसे पक्षातून गेल्याने दु:ख होऊन रात्रीची झोपही लागत नाही, ही वस्तुस्थिती आहे; पण कुणी सत्तेचा ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही. मात्र, भाजपची सत्ता गेल्यानंतर चंद्रकांतदादांना एक हजार वॅटचा बल्ब घेऊन कार्यकर्ते शोधावे लागतील, असा पलटवार राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुण इंगवले यांच्या भाजप प्रवेशावेळी शनिवारी (दि. ७) पालकमंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्ला चढवीत, हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादी संपली असून, मुश्रीफ यांची आता झोप उडाली, अशी बोचरी टीका केली होती. मंत्री पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, अनेक वर्षे संघटनेत काम करणारी जिवाभावाची माणसे पक्ष सोडून गेल्याने दु:ख होते. पक्ष सोडून त्यांचे भले होणार असेल तर त्यांना अडविण्याचा अधिकार आपणाला नाही, त्यांना शुभेच्छा देतो. शिवसेनेला ‘जातीयवादी’ म्हणून हिणवणाऱ्या मुश्रीफ यांना कागलमध्ये त्यांची मदत कशी चालते, असेही मंत्री पाटील यांनी म्हटले आहे. नगरपालिका निवडणुकीत आम्ही शिवसेनेबरोबर युती केलेली नाही. सुरुवातीच्या टप्प्यात संजय मंडलिक यांच्याबरोबर आमची चर्चा सुरू होती; पण नंतर त्यांनी फारकत घेतल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जांभळे यांचे पद जाणारच!कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांनी एकत्रित निवडणूक लढविली होती, त्याचे पुरावे न्यायालयात सादर करणार आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयांचे यापूर्वीचे निकाल पाहिले तर एकत्रित निवडणूक लढविल्यास पक्षाला ‘व्हिप’ बजावण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणीही काहीही म्हणो; अशोक जांभळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे पद जाणार हे नक्की, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. सामान्य माणूसच नाव पैलतीरी नेईलसत्तेसाठी नेतेमंडळी पक्षातून बाजूला गेली असली तरी सामान्य माणूस आपल्यासोबत आहे. त्यामुळे हीच माणसे आमची नाव पैलतीरी निश्चित नेतील, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.‘राष्ट्रवादी-भाजप’ आघाडी झाल्यास आश्चर्य नकोकुरुंदवाड नगरपालिकेत सत्तेत येण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील व सुरेश हाळवणकर यांनी राष्ट्रवादीला आॅफर दिली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एखाद्या ठिकाणी राष्ट्रवादी-भाजप अशी आघाडी झाली तर आश्चर्य नको, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.