दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात लेखक यदुनाथ थत्ते यांच्या ‘आपला मान आपला अभिमान’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच लेखक श्रीकांत पाटील यांची परखड मुलाखत होणार आहे. दुपारच्या सत्रात कृष्णात कोरवी व भरतकुमार पाटील यांचा कथाकथन, तर शेवटच्या सत्रात कवियित्री माणिक नागावे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कवी संमेलन होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिरढोण सरपंच चंद्रकांत चव्हाण भूषविणार असून, संमेलनाचे उद्घाटन गुरुदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, आमदार प्रकाश आवाडे, संजय पाटील-यड्रावकर, राहुल खंजिरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती संमेलन संयोजन समिती प्रमुख विश्वास बालिघाटे यांनी दिली.
शिरढोणमध्ये रविवारी ग्रामीण साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:24 IST