बाजारभोगाव : अतिवृष्टीमुळे आधीच कमकुवत झालेली वारनूळ (ता. पन्हाळा ) येथील ग्रामपंचायत इमारतीची पडझड झाली आहे. त्यामुळे दप्तर ठेवणे, मासिक सभा व ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अडचणींचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वारनूळ हे सुमारे १२०० लोकसंख्येचे गाव आहे. माठ बनवणारे गाव म्हणून त्याची वेगळी ओळख आहे. ४५ वर्षांपूर्वी दगड-विटा मातीचे बांधकाम करून ग्रामपंचायतीची ही इमारत बांधण्यात आली होती. ती जीर्ण झाली असून, अतिवृष्टीमुळे आधीच कमकुवत झालेल्या या इमारतीच्या पाठीमागील भिंतीचा काही भाग कोसळला आहे.
चौकट :
इमारतीचे दोन वर्षांपूर्वी निर्लेखन करण्यात आले आहे. इमारत मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे यापूर्वी प्रस्ताव दाखल केला आहे. लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु निधी मंजूर नसून तो तत्काळ मंजूर करावा.
सागर पोवार
सरपंच, वारनूळ