शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयातच यावर्षीपासून मिळणार पदवी प्रमाणपत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:59 IST

महाविद्यालयात पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र त्या ठिकाणीच वितरित करण्याचा परिनियम नवीन विद्यापीठ कायद्यामध्ये आहे. याबाबत शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने केलेली शिफारस सोमवारी व्यवस्थापन परिषदेने मान्य केली.

ठळक मुद्देविद्यापरिषदेची शिफारस मान्य : शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची बैठक

कोल्हापूर : महाविद्यालयात पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र त्या ठिकाणीच वितरित करण्याचा परिनियम नवीन विद्यापीठ कायद्यामध्ये आहे. याबाबत शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने केलेली शिफारस सोमवारी व्यवस्थापन परिषदेने मान्य केली.

विद्यापीठ कार्यालयात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या उपस्थितीमध्ये व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. सदस्य सचिवपदी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ झाल्यानंतर ३0 दिवसांमध्ये महाविद्यालयातील पदवीधरांना त्यांची पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र महाविद्यालयातच वितरित करण्याचा परिनियम आहे. या परिनियमानुसार शिवाजी विद्यापीठाच्या यंदाच्या ५५ व्या दीक्षान्त समारंभापासून कार्यवाही करण्याबाबतची विद्या परिषदेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्य करण्यात आली.या परिनियमानुसार कार्यवाही करण्याबाबत विद्यापीठाने समिती नेमली आहे. त्याच्या अंमलबजावणीबाबत अहवाल संबंधित समिती पुन्हा व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवणार आहे.

या परिषदेने अंतिम मान्यता दिल्यानंतर या परिनियमानुसार कार्यवाही होणार आहे. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत महाविद्यालय अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत अनुदानप्राप्त होण्यासाठी पारंपरिक महाविद्यालयांनी सादर केलेल्या प्रस्तावांबाबत छाननी समितीने केलेल्या शिफारशी मान्य करण्यात आल्या. वनस्पतीशास्त्र अधिविभागात इनक्युबेशन अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज (कºहाड), छत्रपती शिवाजी कॉलेज (सातारा) यांना सन २०१९-२०२९ या कालावधीसाठी दिलेल्या स्वायत्ततेची नोंद घेण्यात आली. विद्यार्थी निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जागरूकता, प्रबोधनाचा कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली.‘सुटा’कडून पुरावे मागवावेतकुलगुरू डॉ. शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतचे पुरावे शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाकडून (सुटा) मागविण्यात यावेत, अशी मागणी व्यवस्थापन परिषदेतील विद्यापीठ विकास आघाडीच्या सदस्यांनी या बैठकीत विद्यापीठ प्रशासनाकडे केली.