शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. निवडणुकीच्या तयारीला लागा

By admin | Updated: April 13, 2017 00:38 IST

चंद्रकांतदादा पाटील : तुरंबे येथे राधानगरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा

तुरंबे : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना करून देऊन आपल्या गावामध्ये भाजप मजबूत करण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. ते राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथे पंडित दीनदयाळ उपाध्ये जन्मशताब्दी वर्ष समारोह कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या राधानगरी तालुका भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च शून्य करण्यासाठी नवीन योजना तयार करण्याचे काम सुरू आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना कर्जेच काढावी लागणार नाहीत. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सत्ता हे माणूस सुखी करण्याचे माध्यम होण्यासाठी गावागावांतील शेवटचा माणूस सुखी करण्यासाठी शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. शेतकऱ्यांना कर्जात जाण्यापासून वाचवून त्याला सक्षम करण्याचा प्रयत्न सरकारचा असून, त्यासाठी चांगली योजना करण्याचे काम सुरू असून, लवकरच योजना कार्यान्वित करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ग्रामपंचायत आणि विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता येण्यासाठी आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी केले. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक आणि भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई म्हणाले, भविष्याचा वेध घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षासाठी वेळ द्यावा. भविष्यातही भारतीय जनता पक्ष सत्ताधारी पक्ष असेल. भविष्यातील सर्वच योजना ग्रामपंचायतीमधून देण्याची योजना असल्याने ग्रामपंचायतीमध्ये पक्षाची सत्ता असणे गरजेचे आहे. यावेळी भुदरगड तालुका अध्यक्ष नाथाजी पाटील, राधानगरी तालुका अध्यक्ष दीपक शिरगावकर, राज्य कार्यकारिणी सदस्य व्ही. टी. जाधव यांची भाषणे झाली. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य लहू जरग, प्रवीण सावंत, संभाजी आरडे, मीनाक्षी नकाते, डॉ. सुभाष जाधव, दिलीप चौगले, सुधाकर गुरव यांच्यासह राधानगरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तुरंबे (ता. राधानगरी) येथे पंडित दीनदयाळ उपाध्ये जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राधानगरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा संघटक बाबा देसाई, लहू जरग, प्रवीण सावंत, धनाजी मोरुसकर, आदी उपस्थित होते.