शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

दिल्लीतील शाहू पुतळा बदलण्याची शासनाची तयारी; लोकमत इम्पॅक्ट, विधानसभेत केली घोषणा

By समीर देशपांडे | Updated: July 5, 2024 15:35 IST

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ‘लोकमत’ने हा पुतळ्याबाबतचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर २४ तासातच याबाबत निर्णय झाला असून शाहू प्रेमींनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 

समीर देशपांडे

कोल्हापूर : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याची शासनाची तयारी आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दुपारी मुंबईतील अधिवेशनात केली. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ‘लोकमत’ने हा पुतळ्याबाबतचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर २४ तासातच याबाबत निर्णय झाला असून शाहू प्रेमींनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 

वडेट्टीवार म्हणाले, दिल्लीतील हा शाहू महाराजांचा पुतळ्यामध्ये शाहू महाराजांच तब्येत कृश दाखवल आहे. डोळे आत गेलेले आहेत. कोल्हापूरच्या दसरा चौकात जसा शाहू महाराजांचा पुतळा आहे तसाच पुतळा दिल्लीत बसवण्यात यावा. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र सदनाच्या उद्घाटनावेळी मी उपस्थित होतो. याला १२/१३ वर्षे झाली आहेत. परंतू आता हा मुद्दा पुढे आला आहे. तर याबाबत जी काही दुरूस्ती करावी लागेल ती करण्यासाठी शासन तयार आहे. कारण हा विषय शाहू महाराजांशी संबंधित आहे. त्यांचे वंशजच आता लोकसभेला निवडून आले आहेत. त्यांचाही याबाबत विचार घेतला जाईल. 

महाराष्ट्र सदनातील शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी अगदीच विसंगत असल्याने ते बदलावेत अशी मागणी ‘लोकमत’ने केली होती. याला शाहूप्रेमी व्यक्ती आणि भाजप, कृती समितीने साथ देत मुख्यमंत्र्यांना निवेदने पाठवली होती. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या बातमीचा परिणाम २४ तासात दिसून आल्याबद्दल आणि शाहू पुतळा बदलण्याच्या निर्णयाबद्दल शाहू प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdelhiदिल्ली