शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Govind Pansare Murder Case: पानसरे दाम्पत्याची रक्ताच्या डागाची कपडे साक्षीदारांनी ओळखली

By उद्धव गोडसे | Updated: March 21, 2023 18:31 IST

संशयित आरोपींचे वकील समीर पटवर्धन, वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अमोघवर्ष खेमलापुरे यांनी साक्षीदारांची उलटतपासणी घेतली

कोल्हापूर : कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यात आज, मंगळवारी (दि. २१) जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर दोन साक्षीदारांच्या साक्षी आणि त्यांची उलटतपासणी झाली. दोन्ही साक्षीदारांनी पानसरे दाम्पत्याची रक्ताच्या डागाने माखलेली कपडे न्यायालयात ओळखली. पुढील सुनावणी तीन एप्रिलला होणार आहे.पानसरे खून खटल्यातील साक्षीदारांच्या साक्षी आणि त्यांच्या उलटतपासणीला मंगळवारपासून सुरुवात झाली. पानसरे दाम्पत्यावर हल्ला झाल्यानंतर आधार ॲस्टर हॉस्पिटलमध्ये जखमींचे कपडे जप्त करण्यात आले. त्यावेळचे पंच इम्तियाज नूरमहम्मद हकीम (वय ४७, रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा, कोल्हापूर) आणि सादिक सिराज मुल्ला (४२, रा. सुभाषनगर, सिरत मोहल्ला, कोल्हापूर) या दोघांची साक्ष विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी घेतली. यावेळी न्यायालयात दाखविण्यात आलेली पानसरे दाम्पत्याची रक्ताच्या डागाने माखलेली कपडे ओळखत असल्याचे दोन्ही साक्षीदारांनी सांगितले. तसेच ॲड. निंबाळकर यांनी विचारलेल्या प्रश्नांनुसार साक्षीदारांनी पंचनाम्याचा घटनाक्रमही सांगितला.संशयित आरोपींचे वकील समीर पटवर्धन, वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अमोघवर्ष खेमलापुरे यांनी साक्षीदारांची उलटतपासणी घेतली. नावापासून ते पंचनाम्यातील बारकाव्यांपर्यंत अनेक जटील प्रश्न विचारून त्यांनी साक्षीदारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दुपारी बाराच्या सुमारास सुरू झालेली हकीम यांची साक्ष आणि उलटतपासणी पावणेदोनला संपली, तर दुपारनंतरच्या सत्रात तीनला सुरू झालेली मुल्ला यांची साक्ष आणि उलटतपासणी पावणेपाचला पूर्ण झाली.

सरकार पक्षामार्फत विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी कामकाज पाहिले. सुनावणीसाठी गुन्ह्यातील सर्व बारा संशयित आरोपींना मोठ्या पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. पुढील सुनावणी तीन एप्रिलला होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालय