शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद पानसरे हत्या प्रकरण :  अमोल काळेला २२ पर्यंत पोलिस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 16:08 IST

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात प्रथमदर्शी सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने या हत्या प्रकरणातील पाचवा संशयित आरोपी अमोल अरविंद काळे (वय ३४, रा. प्लॉट नंबर ३, अक्षय प्लाझा, माणिक कॉलनी, पिंपरी-चिंचवड, पुणे) याला गुरुवारी कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.

ठळक मुद्देगोविंद पानसरे हत्या प्रकरण :  अमोल काळेला २२ पर्यंत पोलिस कोठडीकोल्हापूर न्यायालयात हजर

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात प्रथमदर्शी सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने या हत्या प्रकरणातील पाचवा संशयित आरोपी अमोल अरविंद काळे (वय ३४, रा. प्लॉट नंबर ३, अक्षय प्लाझा, माणिक कॉलनी, पिंपरी-चिंचवड, पुणे) याला गुरुवारी कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.कोल्हापूर एसआयटीने संशयित काळेला १५ वे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) एस. एस. राऊळ यांच्या न्यायालयात सकाळी हजर केले. सुमारे ४५ मिनिटे युक्तिवाद झाला. बुधवारी (दि. १४) बेंगलोर न्यायालयाच्या आदेशानंतर तेथील राजराजेश्वरी पोलिस ठाणे येथून त्याला एसआयटीने ताब्यात घेतले.पुणे येथील डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयने तर कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश हत्ये प्रकरणी बेंगलोर एसआयटीने अमोल काळेला अटक केली होती. या तपासावेळी काळेकडून पानसरे हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे प्रथमदर्शी निष्पन्न झाले. त्यामुळे कोल्हापूर एसआयटीने बुधवारी काळेचा बेंगलोर येथून पानसरे हत्येप्रकरणी ताबा घेतला.

गुरुवारी सकाळी कोल्हापूरातील राजारामपुरी पोलिसांनी त्याला सात वाजून २६ मिनिटांनी अटक केली. त्यानंतर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) वैद्यकिय तपासणी त्याची करण्यात आली. याचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे करीत आहे. त्यांनी सकाळी एस.एस.राऊळ यांच्या न्यायालयात काळेला हजर केले. यावेळी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजीराणे यांनी, पानसरे हत्या प्रकरणात अमोल काळेचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले आहे.

कोल्हापूरात त्याचे यापुर्वी वास्तव्य होते. त्याने कसा कट रचला, त्याचे साथीदार कोण आहेत , त्याने कोल्हापूर परिसरात अग्निशस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण कोठे घेतले, या अनुषंगाने तपास करायचा आहे. त्यामुळे त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी युक्तिवादावेळी केली.तपास अधिकारी तिरुपती काकडे यांनी, संशयित अमोल काळे याचे नोव्हेंबर / डिसेंबर २०१४ मध्ये कोल्हापूरात वास्तव्य होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे. पानसरे हत्या प्रकरणातील हत्यार व वाहन जप्त केलेला नाही. त्यामुळे काळेला पोलिस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद केला.

अमोल काळे याच्यातर्फे अ‍ॅड. समीर पटवर्धन, अ‍ॅड. स्मिता शिंदे यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून एस.एस.राऊळ यांनी, काळेला २२ नोव्हेंबर २०१८ पर्यंत पोलिस कोठडी दिली.

संशयित अमोल काळेला पोलिस वाहनात बसविताना पोलिस अधिकारी व कर्मचारी. (छाया : दीपक जाधव)तपासाबाबत गोपनीयता ; उच्च न्यायालयात अहवालपानसरे हत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास हा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरु आहे. कोल्हापूर व बेंगलोर एसआयटी आणि दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करणारी सीबीआय असे तिघे संयुक्तिरित्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यामुळे तपासातील बाबी प्रसारमाध्यमांना सांगू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने तपासयंत्रणेला दिले आहेत.अमोल काळेबाबत काय तपास केला याचा अहवाल कोल्हापूर एसआयटी २२ नोव्हेंबरला उच्च न्यायालयात सादर करणार असल्याचे अ‍ॅड. राणे यांनी यावेळी सांगितले.

पानसरे हत्या प्रकरण असे...सागरमाळ येथे १६ फेब्रुवारी २०१५ ला गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार झाला. त्यानंतर २० फेब्रुवारीला त्यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. या हत्येप्रकरणी संशयित समीर विष्णु गायकवाड व डॉ. वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर प्राथमिक तपासात संशयित विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. कऱ्हाड ) व सारंग दिलीप अकोलकर (रा. शनिवार पेठ, पुणे) यांचे नांव निष्पन्न झाले. त्यांनाही तीन व चार संशयित आरोपी करण्यात आले.

या प्रकरणात समीर व वीरेंद्रसिंह तावडे या दोघांना जामीन झाला. सध्या समीर हा बाहेर तर तावडे हा डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी सध्या पुणे येथे न्यायालयीन कोठडीत आहे. पवार व अकोलकर यांना कोल्हापूर न्यायालयाने फरारी घोषित केले असल्याचे अ‍ॅड.राणे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर