शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

पानसरे हत्या खटला: समीरच्या मोबाइल संभाषणाची न्यायालयात पडताळणी

By उद्धव गोडसे | Updated: October 10, 2023 00:14 IST

पंच साक्षीदाराचा सरतपास पूर्ण, मंगळवारी उलट तपासणी

उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्याची सुनावणी सोमवारी (दि. ९) तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर झाली. संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (रा. सांगली) याच्या घरातून पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाइलमधील त्याच्या संभाषणाची आणि आवाजाची न्यायालयात पडताळणी झाली. तसेच मोबाइलमधील मेमरी कार्ड आणि संभाषणाच्या लिखित प्रतिच्या पंच साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली.

विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या घरी पोलिसांना काही मोबाइल मिळाले होते. त्यापैकी एका मोबाइलच्या मेमरी कार्डमधील संभाषण पोलिसांच्या हाती लागले होते. त्यात समीरने त्याच्या मैत्रिणीसह काही सहकाऱ्यांशी साधलेल्या संवादाचे संभाषण होते. संभाषणात गुन्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती असल्याने पोलिसांनी मेमरी कार्ड जप्त करून त्यातील संभाषणाची संहिता (लिखित प्रत) तयार केली होती. तसेच त्याच्या आवाजाचे नमुने घेऊन दुसरे मेमरी कार्ड तयार केले. त्यावेळच्या पंच साक्षीदारांची साक्ष सोमवारी झाली. सरकारी वकिलांनी घेतलेल्या साक्षीत साक्षीदाराने पंचनाम्याचा घटनाक्रम सांगून न्यायालयात मेमरी कार्ड आणि त्यातील संभाषण ओळखले.

उलट तपास मंगळवारी (दि. १०) होणार आहे. यावेळी बचाव पक्षाच्यावतीने ॲड. अनिल रुईकर, वीरेंद्र इचलकरंजीकर, प्रीती पाटील आदी उपस्थित होते. सर्व दहा संशयित आरोपीही सुनावणीसाठी पोलिस बंदोबस्तात उपस्थित होते.

संभाषणाची संहिता ४२ पानांची

संशयित समीरच्या संभाषणाची संहिता ४२ पानांची आहे. त्यात मैत्रिणीसह काही सहकाऱ्यांशी केलेला संवाद आहे. संभाषणात त्याने अनेकदा गोविंद पानसरे याच्या नावाचा उल्लेख केला आहे. तसेच काही संशयास्पद संवाद हाती लागल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

मोबाइल वाजला अन् न्यायाधीशांनी आरोपीस सुनावले

सुनावणीसाठी आरोपींच्या कक्षात उपस्थित असलेला संशयित समीर गायकवाड याचा मोबाइल मध्येच वाजला. याची गंभीर दखल घेऊन न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी संशयितास समोर बोलवले. त्याला कडक शब्दात समज देऊन न्यायालयात पुन्हा गैरवर्तन खपवून घेणार नसल्याचे सांगितले. सुनावणीसाठी उशिरा आल्याबद्दलही त्याला खडसावले. पोलिसांनी त्याचा मोबाइल काढून घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरे