उदगांव (ता. शिरोळ) येथील शासकीय कुंजवन कोविड केंद्रात याबाबत बैठक घेण्यात आली. या केंद्रात चालत असलेल्या अनियमिततेबद्दल सासणे यांनी आवाज उठविला होता. गरीब रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहावर पैसे मिळवणाऱ्या अपप्रवृत्तींना आवर घालावा अन्यथा उपोषण करू, असा इशारा त्यांनी दिल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. तालुक्यातील तिन्ही कोविड केंद्रात शिल्लक बेड माहिती असणारा फलक, वैद्यकीय अधिकारी व रुग्णवाहिका पोलीस स्टेशन यांचे संपर्क क्रमांक असणारा फलक व कशासाठी ही पैसे घेण्यात येऊ नयेत अशा अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
तर या कोविड केंद्राला चांगला कर्मचारी वर्ग तत्काळ देऊ, असे डॉ. दातार यांनी सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी शंकर कवितके, कोविड केंद्राचे प्रभारी डॉ. महेंद्र कुंभोजकर, विशाल सासणे आदी उपस्थित होते.
फोटो - १९०५२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - उदगांव (ता. शिरोळ) येथील बैठक सुरू असताना एका नातेवाइकाने अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली.