शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू संघाच्या गतवैभवासाठी सरकार पाठीशी : चंद्रकांतदादांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 17:24 IST

कोल्हापूर : व्यक्तीप्रमाणे संस्थांच्या वाटचालीत चढउतार येत जातात; त्यातून मार्ग काढून जे पुढे जातात, तेच यशस्वी होतात. याप्रमाणे डॉ. संजय पाटील यांनी ‘तंबाखू’ संघाला पुन्हा उभारी आणण्याचा प्रयत्न केला असून, संघाच्या गतवैभवासाठी सरकार पाठीशी राहील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

ठळक मुद्दे तंबाखू संघ सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात स्मरणिकेचे प्रकाशन ‘अंबाबाई’बरोबर ‘महालक्ष्मी’ला साकडे‘शक्ती मिल’मधून कर्जमाफीएवढे पैसे‘आप्पा’,‘एस. के.’ नावांचा करिष्मा!

कोल्हापूर : व्यक्तीप्रमाणे संस्थांच्या वाटचालीत चढउतार येत जातात; त्यातून मार्ग काढून जे पुढे जातात, तेच यशस्वी होतात. याप्रमाणे डॉ. संजय पाटील यांनी ‘तंबाखू’ संघाला पुन्हा उभारी आणण्याचा प्रयत्न केला असून, संघाच्या गतवैभवासाठी सरकार पाठीशी राहील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

शेतकरी सहकारी तंबाखू संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘तंबाखू संघा’च्या अधोगतीची कारणे शोधून बाहेर पडण्याच्या योजना शोधा. संस्थांच्या चौकशा कधीपासून प्रलंबित आहेत, याची माहिती द्या, असे सांगत मंत्री पाटील म्हणाले, आम्ही आतापर्यंत न्यायाच्या बाजूने उभे राहिलो आहोत; ‘तंबाखू संघ’, ‘मयूर’सह इतर संस्था ताकदीने सुरू करा, सरकारकडून लागेल ती मदत दिली जाईल.

सहकाराचा पाया खासगीकरणामुळे डळमळीत झाला असून, संस्था जागरूकपणे चालविणे गरजेचे असल्याचे सांगत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, संजय पाटील यांनी ‘तंबाखू’ समूहाच्या माध्यमातून सहकार वाढविला; पण कदाचित राजकारणात आल्यामुळे त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. समाज बदलण्याची ताकद सहकारात असल्याने डॉ. पाटील यांनी संस्था पुन्हा सक्षम कराव्यात.

आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. शहाजी पाटील यांनी स्वागत केले. सुशांत पाटील यांनी आभार मानले. पाहुण्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन व ज्येष्ठ संचालकांचा सत्कार करण्यात आला. कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयरामबापू पाटील, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, बाबा देसाई, आदी उपस्थित होते.‘आप्पा’,‘एस. के.’ नावांचा करिष्मा!

जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत ‘आप्पा’ (महादेवराव महाडिक) व ‘एस. के.’ (एस. के. पाटील) ही नावे प्रसिद्ध आहेत. या माणसांमुळे सामान्यांचे जीवन आनंदी होण्यास मदत झाल्याचे गौरवोद्गार मंत्री पाटील यांनी काढले.

‘शक्ती मिल’मधून कर्जमाफीएवढे पैसे

राज्यात अनेक प्रकरणे न्यायालयीन पातळीवर प्रलंबित आहेत. यासाठी मोठमोठ्या वकिलांची फौज घेऊनच आम्ही फिरत असून, मुंबईतील ‘शक्ती मिल’ सरकारच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन महिन्यांत स्थगिती उठवू अन्यथा संबंधितांशी समझोता करू. यातून ३८ हजार कोटी उभा राहणार आहेत. आम्हाला कर्जमाफीसाठी ३४ हजार कोटी लागणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

‘अंबाबाई’बरोबर ‘महालक्ष्मी’ला साकडे

तंबाखू संघाला गतवैभव मिळवून देण्यासाठी संजय पाटील यांना ‘अंबाबाई’नेच नव्हे तर ‘महालक्ष्मी’नेही ताकद द्यावी, असे समोर बसलेले वसंतराव मुळीक यांचा उल्लेख करीत मंत्री पाटील यांनी ‘अंबाबाई की महालक्ष्मी?’ या वादावर बोट ठेवल्याने सभागृहात एकच हशा पिकला.