शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मागण्यांबाबत सरकार सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:03 IST

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न, मागण्यांची सरकारला जाण आहे. काही व्यावहारिक अडचणींमुळे त्यांच्या पूर्ततेला विलंब होत आहे. मात्र, सरकार सकारात्मक असून, या मागण्यांची पूर्तता केली जाईल. याबाबत मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री यांच्यासमवेत महासंघाच्या शिष्टमंडळाची बैठक मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली.अखिल भारतीय प्राथमिक ...

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न, मागण्यांची सरकारला जाण आहे. काही व्यावहारिक अडचणींमुळे त्यांच्या पूर्ततेला विलंब होत आहे. मात्र, सरकार सकारात्मक असून, या मागण्यांची पूर्तता केली जाईल. याबाबत मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री यांच्यासमवेत महासंघाच्या शिष्टमंडळाची बैठक मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ संलग्न राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मार्केट यार्ड येथील छत्रपती शाहू सांस्कृतिक सभागृहातील या कार्यक्रमास अध्यक्ष शिवाजीराव पाटील प्रमुख उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, कर्जमाफीमुळे सरकारने मोठा आर्थिक भार उचलला आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी थोडी विस्कटली आहे. कर्ज घेण्यासह ती फेडण्याची क्षमता सरकारमध्ये आहे. त्यामुळे सातवा वेतन आयोग उशिरा लागू केला, तरी शिक्षकांचे नुकसान सरकार होऊ देणार नाही. एमएससीआयटीबाबत मुदतवाढ , महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांना सरकारने वेतन देणे, आदींवर सकारात्मक कार्यवाही होण्याबाबत प्रयत्न केला जाईल.या कार्यक्रमात सेवानिवृत्तीबद्दल संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांचा आणि नूतन जिल्हाध्यक्ष संभाजी बापट यांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार केला.यावेळी मोहन भोसले, माधवराव पाटील, बाळासाहेब काळे, लायक पटेल, उत्तम सुतार, मारुती गुरव, वसंत जाधव, शशिकला वरुटे, दि. स. भालतडक, मधुकर काठोळे, नामदेव रेपे, अरुण पाटील, वसंतराव हारुगडे, विजय बहाकर, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते. संभाजी बापट यांनी प्रास्ताविक केले.राज्यातील शिक्षकांमध्ये मोठी खदखदकार्यक्रमात महासंघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी विविध मागण्या मांडल्या. ते म्हणाले, राज्यातील तीन लाख प्राथमिक शिक्षकांपैकी अडीच लाख शिक्षक हे महासंघाचे सभासद आहेत. मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा, अडीच लाख शिक्षक एकाच ठिकाणी आणतो. बदलीमुळे शिक्षक हैराण झाले आहेत. त्यामुळे तालुकाअंतर्गत बदल्या कराव्यात. जुनी पेन्शन पूर्ववत सुरू करा. ‘एमएससीआयटी’ पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ द्या. सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करा. खेड्यापाड्यातील शाळा बंद करू नका. राज्यातील शिक्षकांमध्ये मोठी खदखद असून, ती दूर करण्यासाठी प्रश्नांची निर्गत करा. ती केल्यास आम्ही तुम्हाला बळ देऊ. मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी महासंघाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घ्यावी.