शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

योजना हजार, अधिकारी मात्र बेजार; लागोपाठच्या व्हीसी, प्रत्यक्ष बैठका, अहवाल अन् आढावा

By समीर देशपांडे | Updated: September 18, 2024 15:50 IST

जिल्हाधिकारी २२५ समित्यांचे अध्यक्ष

समीर देशपांडेकोल्हापूर : लागोपाठ लागणाऱ्या जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील व्हिडीओ कॉन्स्फरिंगच्या बैठका, स्थानिक कार्यालये आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील बैठका या सगळ्या बैठकांसाठी तयार करण्याचे अहवाल, ज्या त्या विभागाचा आढावा आणि ऑनलाइन भरावयाची माहिती यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी अक्षरश: बेजार झाले आहेत. निवडणूक जवळ येईल तसे महाराष्ट्रात तर ‘योजनांचा पूर आणि बैठकांतून धूर’ निघत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर सरकार गतिमान पद्धतीने चालवले जात हे दाखवण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ उठवत या सरकारने युद्धपातळीवर योजना राबवण्याचे उद्दिष्ट ठेवल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची मात्र तहानभूक हरपली आहे. सद्य जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी यांना दिवस कधी उजाडतो आणि मावळतो हे कळेनासे झाले आहे. या सगळ्यांवरचा भार मग खाली झिरपत जाऊन त्यांच्या हाताखालच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कामासाठी वेळ अपुरा पडायला सुरुवात झाली आहे.‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू होऊन महिना होऊन गेला. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राबविण्यात आलेल्या या योजनेत अधिकाधिक महिलांची नोंदणी करण्यासाठी अंगणवाडीसेविकांपासून सर्वांनाच कामाला लावण्यात आले. परिणामी राज्यभरातून कोट्यवधी महिला लाभधारक बनल्या. परंतु ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वांनाच रात्रीचा दिवस करावा लागला. आपापल्या विभागाचे दैनंदिन कामकाज, सर्व बैठका, त्यातून समोर येणारे प्रश्न, त्याची निर्गत, शासनाच्या येणाऱ्या सुधारित सूचना यातच हे अधिकारी अडकून पडले आहेत.

विधानसभेला लाभ उडविण्याचे नियोजन‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे योजना’, लोकशाही दिन, विविध केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांचे दौरे, गणेशोत्सवाचा बंदोबस्त, रस्त्यांची दुरुस्ती, त्यासाठीची आंदोलने, ‘मुख्यमंत्री योजनादूत’, मतदार याद्यांचा कार्यक्रम, विधानसभा निवडणुकीची तयारी, आयटीआयमध्ये उभारण्यात आलेली संविधान मंदिरे, ‘स्वच्छता ही सेवा योजना’, पूरस्थितीवर देखरेख, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री सूर्यघर योजना, पंतप्रधान आवास योजना अशा सारख्या योजना युद्धपातळीवर राबविण्यात येत असून, याचा लाभ विधानसभेसाठी उठवण्याचे नियोजन सत्ताधाऱ्यांनी केले आहे.

अधिकाऱ्यांची कुचंबणासाहेब व्ही. सी.मध्ये आहेत. बघावे तेव्हा प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष बैठक किंवा व्हीसीमध्येच असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे भेटायला आलेले अभ्यागतही वैतागत आहेत. कोरोनापासून व्हीसीव्दारे बैठका घेण्याचे सुरू झालेले सत्र आता चांगलेच रूळले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांपासून ते मुख्य सचिवांपर्यंत जो-तो आता व्हीसीच घेत असल्याने आणि प्रत्येक वरिष्ठ त्यांच्या साेयीने वेळा ठेवत असल्याने यात अधिकाऱ्यांची कुचंबणा होत आहे.

जिल्हाधिकारी २२५ समित्यांचे अध्यक्षएका जिल्हाधिकाऱ्यांवर सुमारे २२५ समित्यांची जबाबदारी असते. यातील अनेक समित्यांची महिन्यातून किमान एक बैठक घ्यावीच लागते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तर नेहमी वेगवेगळ्या दालनांत वेगवेगळ्या बैठकांचे सत्र चालूच असते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीGovernmentसरकार