शिरवळ : ‘खंडाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे अनुदान शासनाकडून बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे,’ अशी माहिती तहसीलदार शिवाजीराव तळपे व तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी दिली.शिरवळ मंडलातील १९ गावांमध्ये १२ सप्टेंबर २०१३ मध्ये पावसामुळे माती वाहून जाऊन ४९ हेक्टर ४४ आर क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्यामध्ये १९ गावांतील ७१५ बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून १२ लाख ३६ हजार इतकी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे.संबंधित नुकसानीचे अनुदान बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. यामध्ये विशेषत: विंग , मिरजे, पळशी, पारगाव , वडगाव , अतिट, असवली, अजनूज, लोहोम, लिंबाचीवाडी, शिरवळ, कवठे, कण्हेरी, कर्नवडी, गुठाळवाडी, घाडगेवाडी, जवळे, कान्हवडी, झगलवाडी या गावांमधील बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे.तसेच ११ व १३ डिसेंबर २०१४ रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती व फळपिकांच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून २६ लाख १८०० रुपये नुकसान मंजूर झाले आहे. खंडाळा तालुक्याती ९६२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईचे अनुदान जमा करण्यात आले आहे. अशी माहिती तहसीलदार तळपे यांनीदिली. (प्रतिनिधी)अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या गावांमधील नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनाकडून अनुदान १०० टक्के जमा करण्यात आले अन्य बाधित शेतकऱ्यांनी अनुदानासाठी संपर्क साधावा.- शिवाजीराव तळपे, तहसीलदार
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मंजूर
By admin | Updated: May 11, 2015 23:27 IST