शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचारी ७ आॅगस्टपासून संपावर: अनिल लवेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 17:01 IST

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील १९ लाख सरकारी, निमसरकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ७ ते ९ आॅगस्ट या कालावधीत संपावर जाणार आहेत.

ठळक मुद्देजुनी पेन्शन, सातवा वेतन आयोग लागू करण्याची प्रमुख मागणी संपाची दखल न घेतल्यास आॅक्टोंबरपासून बेमुदत संप

कोल्हापूर : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील १९ लाख सरकारी, निमसरकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ७ ते ९ आॅगस्ट या कालावधीत संपावर जाणार आहेत.

यामध्ये राज्यातील १९ लाख तर जिल्ह्यातील ४२ हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. सरकारने या संपाची दखल न घेतल्यास आॅक्टोंबर महिन्यापासून बेमुदत संप करु असा इशारा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य सहसचिव अनिल लवेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.लवेकर म्हणाले, या संपासंदर्भात यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिली आहे. राज्यभरात ७ आॅगस्टपासून तीन दिवस हा संप सुरु राहणार आहे. यावेळी राज्यातील १९ लाख कर्मचारी काम बंद करुन यामध्ये सहभागी होणार आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील ४२ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सरकारी, निमसरकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या मागणीवर अंतिम निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार दोन वर्षांपासून अक्षम्य चालढकल करीत आहे.

सातव्या वेतन आयोगाचे लाभ पूर्वलक्षी प्रभावाने रोखीने देण्यात यावेत, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा मंजूर करावी, १ जानेवारी, २०१८ पासूनचा वाढीव महागाई भत्ता तसेच महागाई भत्याची मागील १४ महिन्यांची थकबाकी तातडीने देण्यात यावी, सेवानिवृत्तीचे वयोमान ६० वर्षांचे करावे, सरकारी कामकाजातील खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे, विनाअनुदानित शाळांना अनुदानाच्या तत्त्वावर आणण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी संपाचा इशारा देण्यात आला आहे.

या संदर्भात राज्य संघटनेच्या निर्णयानुसार बुधवारी दुपारी १ वाजता जिल्हा शाखेतर्फे संपाच्या नोटीसीचे निवेदन देण्यात येणार आहे, असे कळविण्यात आले आहे. 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर