शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचाऱ्यांचा पूरग्रस्तांच्या मदतीवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 04:59 IST

करवीर तहसीलमधील प्रकार । मागच्या दाराने पळविली पोती

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अभूतपूर्व पुराने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे पाहून माणूसकीच्या भावनेतून कनवाळू दानशूरांनी पूरग्रस्तांसाठी पाठवलेल्या चीजवस्तू चक्क सरकारी यंत्रणेनेच हडप केल्याचा प्रकार करवीर तहसील कार्यालयात घडला असून त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. करवीर तहसील कार्यालयात आलेली पूरग्रस्तांसाठीच्या मदतीची पोती येथीलच काही कर्मचाऱ्यांनी मागच्या दारातून पळवून नेल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.

महापुराचा विळखा बसल्याने शेतीसह, घरे, प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. या पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी देशभरातून अनेक सामाजिक संस्थांकडून, शासनाकडून मदत देण्यात आली. शहरातील युवा शक्तीच्यावतीने करवीर तहसील कार्यालयात पूरग्रस्तांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. चांगल्या दर्जाचे साहित्य असल्याने तहसील कार्यालयातील काही कर्मचाºयांनी मदतीची पोती स्वतंत्र ठेवली होती.

या कार्यालयात एक पूरग्रस्त कर्मचारी आहे. त्याला संसारोपयोगी वस्तूंसाठी कार्यालयाच्या वतीने दहा हजार रुपये दिले आहेत. तसेच सामाजिक संस्थांकडून मदतही दिली आहे. त्याच्या नावावर काही कर्मचाºयांनी पूरग्रस्तांसाठी आलेली मदत कार्यालयाच्या पाठीमागील दरवाजाने आपल्या घरी नेली. गेले दोन दिवस कार्यालयात शासकीय मदतीसाठी कोट्यवधींची रोकड येत असल्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या पोलीस यंत्रणेला हा प्रकार लक्षात आला. त्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी तत्काळ तहसीलदार सचिन गिरी यांना सांगितले; परंतु गिरी यांनी आमच्याच कार्यालयात पूरग्रस्त कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी ही मदत आणल्याचे सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.लाजिरवाणा प्रकारपूरग्रस्तांना आलेल्या मदतीवर शासकीय कर्मचारी डल्ला मारीत असल्याने जिल्हा प्रशासनासाठी हा लाजिरवाणा प्रकार आहे. एका तहसील कार्यालयातील हा प्रकार उजेडात आला. इतरही अनेक शासकीय कार्यालयांतून पूरग्रस्तांच्या मदतीची लूटमार होणार नाही यासाठी जिल्हाधिकाºयांनी वेळीच लगाम घालण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर