शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता सर्वेक्षणासाठी शासनाचे साहाय्य मिळणार

By admin | Updated: March 16, 2017 00:17 IST

इचलकरंजी नगरपालिकेत बैठक : २४ हजार मालमत्ताधारकांना दिलासा

इचलकरंजी : शहरातील नगररचना योजनेंतर्गत क-१ सत्ता प्रकाराच्या प्रकरणांची निर्गत करण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणास शासनाच्या नगररचना व भूमापन विभागाने संबंधित नकाशे आणि सात/बाराचे दाखले उपलब्ध करून देण्याचा निर्णय बुधवारी नगरपालिकेत झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला. ज्यामुळे गेली ४० वर्षे प्रलंबित असलेल्या सुमारे ९०० एकर जमिनींवरील २४ हजार मालमत्ताधारकांची मालकीबाबत असलेली समस्या दूर होण्यास मदत मिळणार आहे.शहरामधील नगररचना क्रमांक १ व २ या दोन योजना साधारणपणे ४० वर्षांपूर्वी अस्तित्वात आल्या आहेत. या योजनांमधील काही जमिनी क-१ सत्ता प्रकारात (अनियमित) मोडत असल्यामुळे या जमिनींवरील झालेली घरे, विविध प्रकारचे उद्योग आणि व्यवसायाच्या इमारती अवैध ठरत आहेत. सुमारे ९०० एकरांवर अशा प्रकारच्या २४ हजारांहून अधिक मालमत्ता आहेत. या जमिनींवरील मालमत्ता नियमित करण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी शासन दरबारी जोरदार प्रयत्न केले. ज्यामुळे शासनाच्या नगररचना विभागाने यासाठी स्वतंत्र पथक नेमून या समस्येची निर्गत लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, शासनाकडे असलेल्या यंत्रणेकडून या प्रकरणांची निर्गत लागणे अशक्य झाले.९०० एकरांवरील असलेल्या सर्व इमारती व त्यांच्या वहिवाटी यांचे सर्वेक्षण करण्यासाठी नगरपालिकेच्यावतीने एका खासगी मक्तेदारास ठेका देण्यात आला आहे. आता या जमिनींतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या मालमत्तांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांच्या पुढाकाराने बुधवारी नगराध्यक्ष अ‍ॅड. अलका स्वामी यांच्या दालनात संबंधितांची बैठक झाली. या बैठकीला नगररचना साहाय्यक संचालक संजय चव्हाण, नगर भूमापन अधिकारी सुधाकर पाटील, नगररचना अधिकारी बबन खोत, उपनगराध्यक्ष मोरबाळे, नगरसेवक शशांक बावचकर, आदी उपस्थित होते.बैठकीमध्ये गेले दोन महिने झालेल्या सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला. यामुळे या सर्वेक्षणांतर्गत येणाऱ्या मालमत्तांच्या प्रत्येक इमारतीनिहाय नकाशा, चतु:सीमा ठरणार असून, त्यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यासाठी मदत होणार आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष मोरबाळे यांनी दिली. (प्रतिनिधी)