शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

नंदवाळ येथील जागा भारत राखीव बटालियनसाठी शासनाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 11:58 IST

भारत राखीव बटालियन १ ते १६ च्या तळासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ येथील ११५ एकरचा भूखंड उपलब्ध झाला आहे. या ठिकाणी बटालियनची उभारणी करण्यासाठी शासनाने अखेर मान्यता दिली. अनेक वर्षे बटालियनचा रखडत पडलेला प्रश्न अखेर मार्गी लागल्याने अधिकाऱ्यांसह जवानांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनंदवाळ येथील जागा भारत राखीव बटालियनसाठी शासनाची मंजुरी ११५ एकरचा भूखंड, लवकरच उभारणी

कोल्हापूर : भारत राखीव बटालियन १ ते १६ च्या तळासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ येथील ११५ एकरचा भूखंड उपलब्ध झाला आहे. या ठिकाणी बटालियनची उभारणी करण्यासाठी शासनाने अखेर मान्यता दिली. अनेक वर्षे बटालियनचा रखडत पडलेला प्रश्न अखेर मार्गी लागल्याने अधिकाऱ्यांसह जवानांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.राज्य राखीव पोलीस बलाच्या १ ते १६ बटालियनच्या अधिकारी व जवानांसाठी जागेची व्यवस्था करण्याचे काम सुरू होते. जागेअभावी बटालियनचा मुक्काम दौंड (जि. पुणे) येथे हलविण्यात आला आहे.

राज्य राखीव पोलीस बल गटाचा राज्यात, तसेच राज्याबाहेरही आपत्कालीन, तसेच संवेदनशील परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळणे, सरकारी व खासगी मालमत्तेचे संरक्षण, तसेच सुरक्षिततेकरिता वापर केला जात आहे.

बटालियनचे मुख्यालय बांधण्याचे नियोजन २०११-१२ मध्ये करण्यात आले. त्यानुसार प्रथमत: मजले (ता. हातकणंगले) व तमदलगे (ता. शिरोळ), रेंदाळ व दिंडनेर्ली येथील जागा निश्चित करण्यात आली होती; परंतु त्या ठिकाणीही काही समस्या निर्माण झाल्याने नंदवाळ येथील ११५ एकर जागा निश्चित केली होती. त्या ठिकाणी मुबलक पाणी, मुख्यालय, निवासस्थाने, शाळा, उद्यान, वाहनतळ उभारण्यासाठी सर्वसोयींनीयुक्त जागा उपलब्ध आहे.

या जागेची राज्य राखीव पोलीस बलाच्या अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांनी डिसेंबर २०१९ मध्ये पाहणी केली होती. त्यासंबंधीचा प्रस्तावही शासनाला दिला होता.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील, अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, बी. जी. शेखर, पुणे परीक्षेत्र व समादेशक जयंत मीना, विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी, समादेशक शिवाजी जमदाडे यांचे सहकार्य लाभले.

नंदवाळच्या जागेचा शासन आदेश झाला असून, त्याठिकाणी आम्ही पोलीस वसाहत, मुख्यालय, इमारत, शाळा, तसेच कवायत मैदान यांचे डिझाईन करून लवकरच संपूर्ण तळाची उभारणी करणार आहोत. अर्चना त्यागी, अप्पर पोलीस महासंचालक.

आम्ही मागणी केल्यानुसार मौजे नंदवाळ येथील गायरानमधील जागा भारत राखीव बटालियनचा तळ उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. या जागेत नियोजन करून लवकरच बांधकामास सुरुवात करण्यात येईल.- जयंत मीना, समादेशक,भारत राखीव बटालियन-३.

असा आहे शासन आदेश...मौजे नंदवाळ येथील गट क्र. ६३ मधील ४६ हे. ०८ आर क्षेत्रातील १८ मी. रुंद प्रस्तावित रस्त्याने बाधित भाग वगळून उर्वरित गायरान जमीन सार्वजनिक प्रयोजनाकरिता गृह विभागाच्या नियंत्रणाखाली भारत राखीव बटालियन क्रमांक-३, कोल्हापूर यांना भोगवटामूल्यरहीत रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी शासन मान्यता देत असलेचा आदेश गृह विभागाचे उपसचिव कि. पा. वडते यांनी काढला आहे.

 

  • सदर जमिनीस किमान १२ मी. रुंदीचा रस्ता उपलब्ध होणे आवश्यक आहे.
  • जमिनीपैकी काही क्षेत्र उताराचे आहे.
  • १.५ पेक्षा तीव्र उताराच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नाही.
  • जमिनीवर विकास करताना नियंत्रण नियमावलीनुसार सक्षम अधिकाऱ्यांकडून रेखांकन व बांधकाम नकाशांना मंजुरी घेणे आवश्यक आहे.
  • सामाजिक वनीकरण विभागातर्फे वनीकरण केलेली जागा बांधकाम न करता मोकळी ठेवावी.
  • येथील झांडांची देखभाल व संवर्धन करण्यात यावे.

 

 

टॅग्स :Forceफोर्सkolhapurकोल्हापूर