शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जागा मिळाली : चंदगडच्या ट्रामा केअर सेंटरचा मार्ग अखेर मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 11:38 IST

corona virus Gadhinglaj Hospital Kolhapur : गेल्या आठ वर्षापासून रखडलेल्या बेळगांव-वेंगुर्ला राज्य महामार्गावरील चंदगड तालुक्यातील उपजिल्हा रूग्णालयासह ट्रामा केअर सेंटरचा मार्ग मोकळा झाला. पाटणे फाट्यानजीक हलकर्णी एमआयडीसीतील ४ एकर जागा या सेंटरसाठी मिळाली आहे. त्याठिकाणी उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा असणारे ७० खाटांचे सुसज्ज रूग्णालय उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजागा मिळाली : चंदगडच्या ट्रामा केअर सेंटरचा मार्ग अखेर मोकळाहलकर्णी एमआयडीसीत उभारणार ५०खाटांचा दवाखाना,२० बेडचे आयसीयु युनीट

राम मगदूम

गडहिंग्लज : गेल्या आठ वर्षापासून रखडलेल्या बेळगांव-वेंगुर्ला राज्य महामार्गावरील चंदगड तालुक्यातील उपजिल्हा रूग्णालयासह ट्रामा केअर सेंटरचा मार्ग मोकळा झाला. पाटणे फाट्यानजीक हलकर्णी एमआयडीसीतील ४ एकर जागा या सेंटरसाठी मिळाली आहे. त्याठिकाणी उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा असणारे ७० खाटांचे सुसज्ज रूग्णालय उभारण्यात येणार आहे.२०१३ मध्ये तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर व डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्या प्रयत्नाने या सेंटरला मान्यता मिळाली. परंतु, त्यासाठी निवडलेल्या पाटणे पाट्यावरील या जागेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे हा प्रकल्प रखडला होता.कर्नाटक आणि कोकणला जोडणाऱ्या या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे.त्यामुळे अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. एखादा अपघात झाल्यास जखमींना उपचारासाठी सध्या बेळगाव-गडहिंग्लज आणावे लागते. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अत्यवस्थ रूग्ण वाटेतच दगावल्याची अनेक उदाहरणे आहेत. अत्यवस्थ रूग्णांना ह्यगोल्डन अवरह्णमध्ये उपचार मिळावेत म्हणूनच चंदगडच्या जनतेचा या सेंटरसाठी आग्रह होता.चंदगडचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे.हा दवाखाना डोंगरी व दुर्गम चंदगड तालुक्यातील जनतेला वरदान ठरणार आहे.हॉस्पिटल लवकर उभारा...!३ मार्च २०१७ रोजी हलकर्णी एमआयडीसीमधील १६ हजार चौरस मीटर जागा या सेंटरसाठी देण्याची तयारी औद्योगिक विकास महामंडळाने दाखवली होती. परंतु, त्यासाठी २५ लाख ३५ हजार रूपये भरावे लागणार होते. त्यासाठी शासनाकडून निधी मिळाला नाही. दरम्यान, सुधारित दरानुसार जागेसाठी तब्बल ४२ लाख रूपये भरावे लागणार होते. परंतु, जनतेच्या हितासाठी उभारण्यात येणाऱ्या या सेंटरसाठी ही जागा विनाशुल्क किंवा नाममात्र १ रूपये दराने मिळावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली होती. त्याला खास बाब म्हणून मान्यता मिळाली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दवाखान्याच्या उभारणीसाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.लोकमतने उठविला होता आवाज६ जुलै २०२० रोजीच्या अंकात पाटणे उपजिल्हा रूग्णालय निधीअभावी रखडले या मथळ्याखालील वृत्ताद्वारे लोकमतने याप्रश्नी आवाज उठविला होता. त्याची नोंद घेवून औद्योगिक विकास महामंडळाने नाममात्र दराने ही जागा या रूग्णालयासाठी उपलब्ध करून दिली.

 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर