शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

गोपाळांचा जल्लोष : ‘नेताजी पालकर’ने फोडली तीन लाखांची दहीहंडी

By admin | Updated: August 18, 2014 23:55 IST

कोल्हापुरात हंडी फोडली रे...

गडहिंग्लजच्या नेताजी पालकर गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात सात थर रचत ३७ फूट उंचीवरील ‘युवाशक्ती’ची तीन लाखांची दहीहंडी फोडली. सलग दुसऱ्या वर्षी ही दहीहंडी फोडण्याचा मान या पथकाने मिळविला तर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाची दहीहंडी गोडीविहीर, तर लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मित्रमंडळाची दहीहंडी नृसिंह गोविंदा पथकाने सहा थर रचून फोडली.यंदा प्रथमच कोल्हापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली दहीहंडी शिरोळच्या गोडी विहार तालीम मंडळाने फोडली.सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ‘नेताजी पालकर’चा बाल गोविंदा आकाश मोहितेने काठीने दहीहंडीला फटका मारताच उपस्थित तरुणाईने नृत्याचा फेर धरत जोरदार जल्लोष केला. हजारोंच्या संख्येने उपस्थित तरुणाईचा सळसळता उत्साह, डॉल्बीवर धडाडणारी मराठी-हिंदी गाणी, श्वास रोखायला लावणारे चित्तथरारक मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचा जोश, अशा वातावरणात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी दहीहंडी फोडण्याचा थरार येथील दसरा चौकात तब्बल तीन तासांहून अधिक वेळ रंगला. ‘धनंजय महाडिक युवाशक्ती’च्या दहीहंडीचे यंदा सातवे वर्ष होते. या वर्षीच्या दहीहंडीत नेताजी पालकर, शिरोळमधील जय हनुमान, जय महाराष्ट्र, अजिंक्यतारा, कुटवाडचे नृसिंह तालीम संघ, हसूरचे बालगोपाल तरुण मंडळ, राशिवडे खुर्दचे रासलिंग या पथकांनी सहभाग घेतला. दरम्यान, सायंकाळी साडेसहा वाजता खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या मूर्तीपूजनाने दहीहंडीची सुरुवात झाली. यावेळी जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ, आमदार महादेवराव महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व आमदार के. पी. पाटील, महापौर तृप्ती माळवी, माजी आमदार पी. एन. पाटील, बजरंग देसाई, अरुंधती महाडिक, आदी उपस्थित होते.दरम्यान ताराबाई पार्कातील पितळी गणपती चौकात दरवर्षी ‘गोकुळ’च्यावतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ‘गोडीविहीर’ने सहा थर रचल्यानंतर संजय गोधडे या गोविंदाने दहीहंडी फोडली. या मंडळास ५० हजारांचे बक्षीस ‘गोकुळ’चे संचालक विश्वास पाटील व रवींद्र आपटे यांच्या यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक उपस्थित होते.दरम्यान, लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मित्रमंडळाची दहीहंडी फोडण्यासाठी रासलिंग (राशिवडे), अजिंक्यतारा, जय महाराष्ट्र व नृसिंह गोविंदा पथक (कुटवाड) आले होते. ‘नृसिंह’ने सहा थर रचल्यानंतर ही दहीहंडी पहिल्याच प्रयत्नात शिवाजी कोळी या गोविंदाने फोडली. यावेळी ‘जय महाराष्ट्र’ने केलेल्या प्रयत्नात सहाव्या थरावरून खाली पडल्याने एक गोविंदा किरकोळ जखमी झाला. यावेळी काहीसा गोंधळ उडाला. पाणी प्यायल्यावर तो शुद्धीवर आला. भाऊसिंगजी रोड, गुजरी कॉर्नर येथे बांधलेली दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. शिरोळच्या गोडी विहार तालीम मंडळाने ही दहीहंडी फोडून स्मृतिचिन्हावर नाव कोरले. विजेत्या संघाला नगरसेवक सत्यजित कदम, ‘मनसे’ परिवहन सेना जिल्हाध्यक्ष विजय करजगार, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, शिवाजी कंदले, म्हसोबा देवालय आझाद मंडळाचे अध्यक्ष संजय करजगार, उपाध्यक्ष विराज ओतारी, तानाजी पाटील, विनोद लांडगे, सचिन घोटणे, प्रकाश लांडगे, आदी उपस्थित होते. राजकीय पक्षांच्या मंडळींची मांदियाळी‘युवाशक्ती’च्या दहीहंडी सोहळ्यास आमदार राजेश क्षीरसागर, ‘गोकुळ’चे संचालक विश्वास पाटील, रवींद्र आपटे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश कुऱ्हाडे, जिल्हा परिषद सदस्य अमल महाडिक, चंद्रकांत बोंद्रे, रामराजे कुपेकर, सुहास लटोरे, नगरसेवक प्रकाश गवंडी, सत्यजित कदम, राजू लाटकर, उद्योगपती अरविंदकुमार रुहिया, राष्ट्रवादीचे करवीर तालुका अध्यक्ष मधुकर जांभळे, संजय सावंत, संगीता खाडे, विजयसिंह मोरे, राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील, कादरभाई मलबारी, शंकर पाटील, दिनकर कांबळे, पी. डी. धुंदरे, रामभाऊ चव्हाण, माणिक पाटील-चुयेकर, आदी उपस्थित होते.बालगोविंदांसाठी विशेष दक्षतादहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात बालगोविंदा जखमी होऊ नयेत, यासाठी संयोजकांनी विशेष दक्षता घेतली होती. बालगोविंदाला विशेष रोप लावण्यात येत होता. ही सुविधा हिलरायडर्स ग्रुपने पुरविली. गुणवंत खेळाडूंचा गौरवराष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते गणेश माळी, ओंकार ओतारी, चंद्रकांत माळी आणि राही सरनोबत यांच्यातर्फे त्यांच्या नातेवाईकांना, तर ‘आर्यन मॅन’ ठरलेल्या आकाश कोरगांवकरला ११ हजार रुपये व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.