शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गुळवे, मजुरांअभावी गुऱ्हाळघरे बंदच

By admin | Updated: October 26, 2014 23:26 IST

गुऱ्हाळमालक हतबल : १४५० पैकी सुमारे ६०० गुऱ्हाळघरे सुरू होण्याच्या मार्गावर

किरण मस्कर -कोतोली -यंदाच्या गूळ हंगामाला सुरुवात झाली असली तरी या हंगामासाठी गुऱ्हाळमालकांसमोर गुळव्याच्या व मजुरांच्या टंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील अनेक गुऱ्हाळमालकांकडून गुळव्यांचा व मजुरांचा शोध सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.गुळव्याबरोबर अन्य मजुरांच्या टंचाईमुळे यंदा जिल्ह्यामधील १४५० पैकी सुमारे ६०० गुऱ्हाळघरे सुरू होण्याची शक्यता बाजार समितीने वर्तवली आहे. गेल्या हंगामात बाजार समितीकडे जिल्ह्यातून २५ लाख ५० हजार ३० किलो गुळाची आवक होऊन २५ ते ३० कोटींची मोठी उलाढाल झाली. यामध्ये बहुतांश गूळ गुजरात बाजारपेठेकडे गेला. पारंपरिक पद्धतीचा गूळ बनविणारे गुळवे पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडीस डोंगराळ भागात आहेत. मात्र, गुळव्यांच्या टंचाईमुळे गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापुरातील अनेक गुऱ्हाळमालक, शेतकरी गुळव्यांचा शोध घेत आहेत. दरवर्षी चार महिन्यांच्या हंगामासाठी गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजुरांची तीन ते पाच लाखांपर्यंत मजुरी द्यावी लागते. गेल्या काही वर्षांपासून काही मजुरांच्या टोळ्यांनी पैसे घेऊनदेखील कामाला न येता गुऱ्हाळमालकाला फसविल्याचे प्रकार घडले. या भीतीपोटी परजिल्ह्यांतील मजुरांना गुऱ्हाळावर आणण्याचे टाळले आहे.अनेक गुऱ्हाळमालकांनी गुळव्यांच्या टंचाईमुळे गुळव्यांचे तंत्र आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे, तर स्थानिक मजुरासह घरातील काही सदस्यांना घेऊन गुऱ्हाळघर चालविण्याचा निर्णय काही गुऱ्हाळ मालकांनी घेतला आहे. दरवर्षी मजुरांची कमतरता जाणवू लागल्याने जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. १४५० गुऱ्हाळघरांसाठी सुमारे ५० ते ६० हजार मजुरांची गरज असताना अवघे २० ते २५ हजार मजूर उपलब्ध होतात. त्यामुळे मजुरांअभावी अनेक गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.गुळवे प्रशिक्षण केंद्र स्थापण्याची गरजदरवर्षी मजूर व गुळवे यांची कमतरता भासते. त्याकडे शासनाने लक्ष देऊन अथवा कृषी संशोधन केंद्राने हे प्रशिक्षण केंद्र स्थापन करून गुळवे तयार करण्याची गरज आहे. बाजार समितीकडून प्रशिक्षणाचे आयोजन केले जात नाही. शासन पातळीवर कृषी महाविद्यालयांनी फक्त प्रदर्शनापुरत्या गूळ बनविण्याच्या कार्यशाळा घेतल्या, असे मत कोलोली (ता. पन्हाळा) येथील गुऱ्हाळमालक राजाराम श्रीपती जाधव, डॉ. मानसिंग सर्जेराव जाधव, बाबासो हणमंत जाधव, विकास राजाराम पाटील यांनी व्यक्त केले आहे.